Menu Close

ठाणे येथे विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

आंदोलन करतांना धर्मप्रेमी

ठाणे : भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना कथित हेरगिरी केल्याच्या आरोपाखालील देण्यात आलेली फाशी रहित करावी तसेच अयोध्येत श्रीराम मंदिर उभारावे आणि शहरे आणि वास्तू यांना परकियांनी दिलेली नावे त्वरित पालटावी या मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समितीद्वारे १५ एप्रिल या दिवशी राष्ट्रीय हिंदू आंदोलन ठाणे स्थानकाबाहेर घेण्यात आले. या आंदोलनात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदू राष्ट्र सेना, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती, रणरागिणी शाखा या हिंदुत्वनिष्ठ संघटना सहभागी झाल्या होत्या. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद वडके म्हणाले की, कुलभूषण यांच्या फाशीला विरोध करताना कोणी दिसत नाही. पण क्रिकेटचे खेळ मात्र रांगा लावून बघतो. कारण आपली मानसिकता षंढ झाली आहे.

मान्यवरांचे विचार

जाधव यांची फाशी रहित होण्यासाठी एकत्र या !  – श्री जयेश गायकवाड,  शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

पाकिस्तान भारतावर आक्रमणे करतो आणि आपण षंढासारखे शांत बसतो. भारताचे कुलभूषण जाधव यांचे प्रथम अपहरण करून नंतर त्यांना विनाकारण बंदी बनवले याचा आपल्याला राग कसा येत नाही ? आतापर्यंत भारताने पाकिस्तानवर अनंत उपकार केले. पण पाकिस्तान सैदव आपला घात करत असतो. जाधव यांची फाशी रहित होण्यासाठी एकत्र या !

 भारतातील गावांची आणि वास्तूंची नावे येथील नागरिकांचीच हवीत ! – दीक्षा पेंडभाजे, सनातन संस्था

जाधव यांच्या फाशीच्या विरोधात सर्वांनी एकवटले पाहिजे आणि पाकवर दबाव आणला पाहिजे. परकियांनी आक्रमण करून आमच्या गावांची, वास्तूंची नाव पालटली. ती पालटण्यासाठी एकजुटीने जोर धरला पाहिजे.

कुलभूषण जाधव यांना शोधण्याचे दायित्व आपले आहे ! – प्रकाश सावंत, हिंदु राष्ट्र सेना

हे आंदोलन म्हणजे ज्वाला आहे. कसाबसाठी सुप्रिम कोर्ट रात्री चालू करण्यात आले होते. तर कुलभूषण यांना वकील मिळण्यासाठी दबाव आणला पाहिजे. कुलभूषण यांच्या केसालाही धक्का न लावता त्यांना पाकने सोडले पाहिजे. कुलभूषण जाधव यांना शोधण्याचे दायित्व आपले आहे.

प्रत्येकाने ट्विट करायला हवे की कुलभूषण यांची फाशी रहित करा ! – कैलास जाधव, हिंदू राष्ट्र सेना

भारतात परकीय आक्रमणे होऊन गेली. आज भारत स्वतंत्र होऊन देखील अजून तीच नावे आहेत. युतीचे सरकार असूनही ‘औरंगाबाद’चे संभाजीनगर होऊ शकत नाही. भगवान श्रीराम इथे जन्मले याचा पुरावा द्यावा लागतो. प्रत्येकाने ट्विट करायला हवे की कुलभूषण यांची फाशी रहित करा.

पाक गुप्तहेरांना भर चौकात फासावर लटकवा ! – सुनीता पाटील, रणरागिणी शाखा

कुलभूषण यांची फाशी हा पूर्वनियोजित हत्येचा कट आहे. भारताने पाकचे ५०० गुप्तहेर पकडले आहेत. त्यांना फासावर लटकवायला आरंभ करा म्हणजे कुलभूषण जाधव लगेच भारतात येतील. मोदींनी ‘राममंदिर बांधू’ असे आश्‍वासन दिले म्हणून त्यांना निवडून दिले. अंदमान- निकोबार यांची नावे शाहीद आणि स्वराज्य अशी व्हायला हवीत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *