मुंबई : १६ एप्रिलपासून मशिदींवरील भोंगे काढण्याच्या संदर्भात देशभरात पुन्हा चर्चा चालू झाली आहे. आज आधुनिकतेचा वापर करून एस्.एम्.एस्.(लघुसंदेश) आणि व्हॉटस्अॅप यांच्या माध्यमातून तलाक दिलेला चालतो; मग अजानसाठी मशिदींवर भोंगेच का हवेत ? नमाजासाठीची अजानसुद्धा एस्.एम्.एस्., तसेच अलार्मद्वारे का दिली जाऊ शकत नाही, असा प्रश्न हिंदु जनजागृती समितीने भोंग्यांचे आणि त्या माध्यमातून होणार्या ध्वनीप्रदूषणाचे समर्थन करणार्यांना विचारला आहे. समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, भारत हा हिंदुबहुल देश आहे.
भारतात १४ टक्के मुसलमानांना नमाजाला बोलवण्यासाठीची भोंग्यातून दिली जाणारी कर्णकर्कश आणि पहाटेच्या वेळीची अजान ८६ टक्के असणार्या मुसलमानेतरांनी इच्छा नसतांनाही का ऐकावी ? आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी ‘नमाजसाठी अजान महत्त्वाची, भोंगे नाहीत’, असे म्हटले आहे. त्यामुळे मोदी शासनाने देशभरातील तीन तलाक, बहुपत्नीत्व, बुरखापद्धत यांसह आता मशिदींवरील भोंग्यांवरही बंदी आणण्याच्या सूत्रालाही प्राधान्य देऊन सर्वसामान्यांना होणारा त्रास दूर करावा, असे आवाहनही समितीने केले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात