Menu Close

मक्केमध्ये पवित्र दगडाला स्पर्श करत असतांना झाले लैंगिक शोषण

अभिनेत्री सोफिया हयात यांचा आरोप

सोफिया हयात, अभिनेत्री

नवी देहली : अभिनेत्री सोफीया हयात यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पानावर एक चित्रफीत पोस्ट करत म्हटले की, भावी पतीसमवेत मक्का येथे गेले असता त्यांचे लैंगिक शोषण करण्यात आले.

सोफीया हयात यांनी लिहिले आहे, ‘इस्लाममध्ये महिलांचा सन्मान करायला शिकवले जाते. कोणताही पुरुष स्वतःची पत्नीवगळता अन्य कोणत्याही महिलेला स्पर्श करू शकत नाही; मात्र मक्केमध्ये हा नियम लागू होत नाही. येथे गेल्यावर पुरुष हा नियम विसरतात. जेव्हा मी येथे पवित्र दगडाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा माझ्या पाठीमागून एक व्यक्ती मला अश्‍लील स्पर्श करत होती. येथे महिलांची वेगळी रांग नव्हती. येथे पुरुषांकडून महिलांना धक्का देण्याचा प्रयत्न केला जात होता. मलाही असाच धक्का देण्यात आला. त्यामुळे मी श्‍वासही घेऊ शकले नाही. मला खूप भीती वाटली. त्या वेळी काही जणांनी मला साहाय्य केले. अल्लाच्या दरबारात काही जणांना कुराणामध्ये लिहिलेल्या गोष्टी लक्षात रहात नाहीत. जर त्यांना वाटते की, अल्ला त्यांच्यामध्ये आहे आणि अशा प्रकारे महिलांची अपकीर्ती करून पवित्र दगडाला स्पर्श केल्याने ते स्वर्गात जाणार असतील, तर ती चुकीची धारणा आहे.’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *