तासगाव (जिल्हा सांगली) : मान्यमार येथून विस्थापित झालेले रोहिंग्या मुसलमान बांगलादेशाच्या सीमेतून घुसखोरी करून भारतात येत आहेत. हे घुसखोर राजधानी देहलीपासून ते जम्मू, बंगाल, बिहार, तेलंगना आदी अनेक राज्यांत अवैधपणे रहात आहेत. वर्ष २००९ पासून यातील बहुसंख्य रोहिंग्या मुसलमान जम्मूमध्ये अवैधरित्या रहात असून शासकीय आकडेवारीनुसार त्यांची संख्या १४ सहस्र इतकी आहे. एकीकडे भारताचे नागरिक असलेल्या साडेचार लाख काश्मिरी हिंदूंना काश्मीरमधून हाकलले जाते, त्यांच्या पुनर्वसनाची कोणतीही योजना केली जात नाही आणि या रोहिंग्या मुसलमानांसाठी जम्मूमध्ये स्वतंत्र वसाहतींसाठी भूमी दिली जाते. आधीच बांगलादेशी मुसलमान घुसखोरांमुळे भारत त्रस्त आहे. तरी देशाच्या सुरक्षिततेसाठी रोहिंग्या मुसलमानांना भारतात आजिबात थारा देऊ नये, जम्मूतील त्यांच्या स्वतंत्र वसाहतीला देण्यात आलेली मान्यता काढून घेण्यात यावी आणि देशभरातील एकेका रोहिंग्या मुसलमानाला शोधून देशातून त्वरित हाकलून देण्यात यावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे श्री. राहुल कदम यांनी केली. ते तासगाव येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित राष्ट्रीय हिंदू आंदोलनात बोलत होते.
या वेळी कु. उज्ज्वला खेराडकर, सौ. शर्वरी रेपाळ, कु. प्रतिभा तावरे यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन कु. सविता खेडाकर यांनी केले.
या वेळी करण्यात आलेल्या मागण्या…
१. हिंदूंना श्रीरामजन्मभूमीवर पूजा करण्यास विशेष अनुमती देण्याचा निर्णय घ्यावा, तसेच या प्रकरणी संसदेत श्रीराम मंदिर उभारणी संदर्भातील कायदा बनवून त्याच्या आधारे अयोध्येत भव्य श्रीराम मंदिर उभारण्यास प्रारंभ करावा.
२. महाराष्ट्र शासनाने अर्थसंकल्पामध्ये केवळ अल्पसंख्यांकांच्या पायाभूत सुविधांसाठी कोट्यवधी रुपयांची केलेली तरतूद रहित करून अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण थांबवावे.
३. अंदमान-निकोबार बेटांसह, देशभरातील शहरे, वास्तू, रस्ते, स्थानके आदींची परकीय आक्रमकांनी पालटलेली आणि परकियांच्या नावे अद्याप असलेली नावे पुन्हा मूळ हिंदु नावांनी नामांतरित करावीत.
४. बोधन (तेलंगण) येथील इंद्रनारायण मंदिरावर अतिक्रमण करून बांधलेली ‘देवल मशीद’ पुरातत्व विभागाने पुन्हा हिंदु मंदिर म्हणून घोषित करावी.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात