कर्णावती : ३ गायींच्या हत्येच्या प्रकरणी मेहसाणा जिल्ह्यातील युसूफ रहमान वेपारी या ६५ वर्षीय कसायाला ३ वर्षे कारावास आणि ५ सहस्र रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. ९ ऑगस्ट २००६ मध्ये पोलिसांनी युसूफ याच्या पशूवधगृहावर छापा मारला तेव्हा तेथून ३०० किलो गोमांस जप्त करण्यात आले. चौकशीत येथे ३ गायींची हत्या करण्यात आल्याचे उघड झाले.
न्यायदंडाधिकारी जे.जे. यादव म्हणाले की, वैज्ञानिक स्तरावर स्पष्ट झाले आहे की, गायीमुळे आपल्याला दूध आणि संतुलित आहार मिळतो, त्यातून आपले आरोग्य चांगले बनते. गोवंश शेतीचे प्रमुख आधार आहेत. देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था त्याच्यावर अवलंबून आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात