कोच्ची (केरळ) : महिलांना प्रवेश बंदी असलेल्या केरळमधील शबरीमला मंदिरात तरुणींचा एक गट मुक्तपणे फिरत असल्याची चित्रफीत प्रसारीत झाली आहे. महिलांना मंदिरात प्रवेशबंदी असतांनाही या महिला आत आल्याच कशा आणि केव्हा, असे प्रश्न उपस्थित झाल्यानंतर केरळ सरकारने याची चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. या मंदिरात १० ते ५० वर्षे वयोगटातील मुली आणि महिला यांना प्रवेश निषिद्ध आहे. ही पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात