सोलापूर : हिंदुस्थानातच हिंदु मंदिरांमध्ये पूजा करण्यास अनुमती मिळत नाही, हे हिंदूंचे दुर्दैव आहे. त्यासाठी आपण संघटित होणे आवश्यक आहे, अयोध्येत हिंदूंना पूजा करण्यास अनुमती द्या आणि श्रीराम मंदिर लवकर बांधा, अशी मागणी येथील गोरक्षक अभय कुलथे यांनी केली. १९ एप्रिल या दिवशी झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात ते बोलत होते. या वेळी रणरागिणी शाखेच्या सौ. अलका व्हनमारे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. बलराज दोंतूल, सनातन संस्थेच्या सौ. लतिका पैलवान आणि सौ. दुर्गा कुलकर्णी यांनीही मनोगत व्यक्त केले.
या वेळी शिवराज पडशेट्टी, सत्यनारायण गुर्रम, तिरूमल श्रीराम, यशपाल चितापुरे, अनिल गाजूल, रणधक्षर स्वामी, श्रीनिवास साखरे, किशोर पुकाळे, सिद्धेश्वर श्रीराम, सत्यनारायण कनकी, चन्नप्पा गोपनपल्ली आणि श्रीनिवास एकलदेवी यांसह ५० हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. आंदोलनानंतर जिल्हाधिकार्यांच्या वतीने तहसीलदार श्रीमती शीतल मुळे-भामरे यांनी निवेदन स्वीकारले. त्यांनी हा विषय वरिष्ठांकडे तात्काळ पाठवणार असल्याचे सांगितले.
विशेष – स्थानिक वृत्तवेध, स्वरांजली आणि इन चॅनल या वृत्तवाहिन्यांनी सौ. अलका व्हनमारे यांची मुलाखत घेतली. (वृत्तवेध वाहिनीचे दीड लाख दर्शक आहेत.)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात