देशाच्या इतिहासातील पहिली घटना ! अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल ज्योतीप्रसाद राजखोवा यांचे अभिनंदन !
आता अशा प्रकारचा निर्णय काश्मीर ते तमिळनाडू आणि गुजरात ते मणीपूरपर्यंत घेण्यात यावा, अशी मागणी हिंदूंनी करावी !
नवी देहली : अरुणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या निर्णयावरून वाद चालू आहे. अशा वेळी राज्यपाल ज्योतीप्रसाद राजखोवा यांनी गोहत्यांमुळे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केल्याचे समोर आले आहे. राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. येथे प्रतिदिन उघडपणे गोहत्या होत आहेत, असे राज्यपालांनी त्यांच्या शिफारसपत्रात नमूद केले आहे.
१. एका इंग्रजी दैनिकातील वृत्तानुसार राज्यपालांनी केवळ त्यांच्या शिफारशीतच गोहत्येचा उल्लेख केलेला नाही, तर या प्रकाराचे गांभीर्य सर्वांच्या लक्षात यावे; म्हणून राजभवनाबाहेरही गोहत्यांची छायाचित्रे लावली आहेत.
२. राज्यपालांच्या वतीने सत्यपाल जैन यांनी न्यायालयात सुनावणीदरम्यान जी माहिती दिली त्यातून हे उघड झाले आहेत.
३. राष्ट्रपती राजखोवा यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, राजकीय अस्थिरतेमुळे काही काँग्रेशी नेत्यांनी राजभवनासमोर मिथुनची हत्या केली होती. (मिथुन ही बैलासारख्या असणार्या प्राण्याची डोंगराळ भागातील जात आहे. उत्तर-पूर्व भागात त्याला गोवंशाच्या प्रकारात गणले जाते.)
४. अरुणाचलमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी, या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या शिफारसीला आव्हान देणारी याचिका काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात केली आहे. त्यावर २७ जानेवारीला सुनावणी झाली होती. त्या वेळी हे प्रकरण अतिशय गंभीर आहे, असे सांगत न्यायालयाने अरुणाचलचे राज्यपाल तसेच केंद्र सरकारचे गृह मंत्रालय यांनी २९ जानेवारीपर्यंत निवेदन सादर करावे, अशी नोटीस दिली आहे.
५. असे असतांनाच राज्यपाल राजखोवा यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे केलेल्या शिफारशीचा तपशीलही महत्त्वाचा मानला जात आहे.
६. सोळा डिसेंबर २०१५ पासून राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. काँग्रेसच्या २१ बंडखोर आमदारांनी भाजपचे ११ आणि अपक्ष २ आमदार यांच्याशी युती केली आहे. मात्र विधानसभा अध्यक्षांनी याला अवैध ठरवले आहे.
राज्यपालांच्या शिफारसीत दावा : मुख्यमंत्री नबाम तुकी यांचे आतंकवाद्यांशी संबंध !
राज्यापाल राजखोवा यांनी राष्ट्रपतींना अरुणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याविषयी केलेल्या शिफारसीत म्हटले आहे की, राज्याचे मुख्यमंत्री नबाम तुकी यांचे बंदी घालण्यात आलेली आतंकवादी संघटना एन्एस्सीएन् (के) यांच्याशी संबंध आहेत. तिराप, चांगलैंड आणि लोंगडिंग येथील आमदारांवर तुकी यांना मुख्यमंत्री म्हणून समर्थन देण्यासाठी दबाव घातला जात आहे. एन्एस्सीएन् (के)च्या आतंकवाद्यांनी तुकी आणि त्यांचे मंत्री असलेले पुत्र टी एबोह यांच्या आदेशाने ३१ डिसेंबर २०१५ ला आमदार होनचुन यांच्या एका नातेवाइकाचे अपहरण करण्यात आले होते. पोलीस प्रशासन राज्यशासनाच्या हातात असल्यानेे या प्रकरणाचे योग्य अन्वेषण झाले नाही. याव्यतिरिक्त या शिफारसीत अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत.