चित्रपटांतून हिंदूंच्या श्रद्धास्थानांच्या सातत्याने अवमान करण्यात येतोे, याविषयी केंद्र सरकार कधी कृती करणार ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
मुंबई : लवकरच प्रदर्शित होणार्या ‘बँक चोर’ या हिंदी चित्रपटाच्या भित्तीपत्रकात आणि यु ट्यूबवर होणार्या विज्ञापनातून अभिनेता रीतेश देशमुख हे स्वामीच्या वेशात हातात पिस्तुल घेऊन भूमिका करत असल्याचे दाखवले आहे. हे भित्तीपत्रक http://www.koimoi.com/bollywood-news/bank-chor-release-date-announced-first-look-poster-motion-poster-released/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
या विडंबनासंबंधी अनेक धर्माभिमान्यांनी हिंदु जनजागृती समितीकडे तक्रारी केल्या. समितीने त्वरित केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाला पत्र लिहून या भित्तीपत्रकाविषयी माहिती देऊन त्यासाठी चित्रपट निर्मात्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे. हिंदूंचे संत, स्वामी आणि पंडित यांना अयोग्य रितीने चित्रपटात सादर करून स्वत:च्या आर्थिक लाभासाठी त्यांचे विडंबन करण्याची सवयच लागली आहे, असे समितीने केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाला (सेन्सॉर बोर्डाला) कळवले आहे. बोर्डाकडून समितीला कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे धर्माभिमानी खालील दूरध्वनी क्रमांकांवर अथवा इ-मेल पत्त्यावर सेन्सारला या विडंबनाविरुद्ध आपल्या भावना कळवून सदर संतांची विटंबना करणारे भित्तीपत्रक काढून टाकण्याची विनंती करत आहेत.
दू.क्र. : ०२२- २३५१०४७६, ०२२-२३५१०४७८
इ-मेल : [email protected], [email protected]
हिंदुद्रोही घटनांचा निषेध संयत मार्गाने करा !
हिंदुद्रोह्यांचा निषेध करण्यामागचा मुख्य उद्देश त्यांचे वैचारिक परिवर्तन करणे, हा आहे. त्यामुळे कोणाचाही निषेध करतांना तात्त्विक सूत्रांच्या आधारे वैचारिक स्तरावर करा ! चुकणार्या व्यक्तीला तिच्या चुका सांगून योग्य मार्गावर आणणे, हा व्यापक दृष्टीकोन निषेध व्यक्त करण्यामागे हवा !
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात