कॅन्टीनच्या कंत्राटदाराची हकालपट्टी
ढाका : बांगलादेशातील प्रसिद्ध ढाका विश्वविद्यालयातील हिंदु विद्यार्थ्यांना गोमांस वाढल्याच्या प्रकरणी प्रशासनाने कॅन्टीनच्या कंत्राटदाराची हकालपट्टी केली आहे. झाकीर हुसेन असे त्याचे नाव आहे. त्याला करारावर कॅन्टीन चालवण्यासाठी देण्यात आली होती. तसेच प्रशासनाने हिंदु विद्यार्थ्यांच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी चौकशीचा आदेशही दिला आहे. यासाठी एका समितीची स्थापना केली असून एक आठवड्यात याचा अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे.
१६ एप्रिलला बांगलादेशातील नूतन वर्षाच्या कार्यक्रमासाठी सहस्रो विद्यार्थी येथे आले होते. या वेळी सकाळच्या अल्पाहाराच्या वेळी गोमांस वाढण्यात आले होते. मुळात कॅन्टीनमध्ये गोमांसाला अनुमती नाही.
झाकीर हुसेन यांनी गोमांस वाढल्याचा गुन्हा स्वीकारला आहे. तो म्हणाला की, बांगलादेश विद्यार्थी लीगचा नेता सोहाग आणि त्यांचे सहकारी जाणीवपूर्वक गोमांसाचा पदार्थ बनवायला सांगितले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात