जातीयवादी राजकारणाशिवाय दुसरे काहीच करता येत नसलेले जितेंद्र आव्हाड !
नंदुरबार : पशूवधगृहे आणि मांसाहार यांवर बंदी म्हणजे प्रत्यक्षात दलित अन् बहुजन यांच्या खाद्य संस्कृतीवरील आक्रमणच आहे. जातीजातीत रुजलेला बंधुभाव आणि ऋणानुबंध संपवण्याचे हे शासनाचे कारस्थान आहे, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी येथील शेतकरी मेळाव्यात झालेल्या भाषणात केले. संघर्ष यात्रेत ते बोलत होते.
शेतकरी मेळाव्याचे आयोजन करतांना नंदुरबार जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी खेड्यापाड्यातून आलेल्या शेतकर्यांची विचारणा करून त्यांची बैठक व्यवस्था करणे, सभास्थळी भव्य मंडप आणि पडदे टाकून सावली उपलब्ध करून देणे, पाणी वाटपाची सोय करणे, आसंद्यांची व्यवस्था करणे अशा प्रकारे साहाय्य केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात