Menu Close

‘डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष होणार’, असे भविष्य वर्तवणार्‍याने वर्तवले नवीन भविष्य, ‘१३ मेपासून होणार तिसरे महायुद्ध !‘

तिसरे महायुद्ध झाले, तर त्याला भारत सिद्ध आहे का ? या वेळी येणार्‍या आपत्काळात जनतेचे रक्षण आणि त्यांना सुविधा पुरवण्याची सिद्धता भारताकडे आहे का ? –  संपादक, दैनिक सनातन प्रभात

वॉशिंग्टन : वर्ष २०१५ मध्येच ‘डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होतील’, असे भविष्य वर्तवणार्‍या क्लेयरवायंट होरोसिओ विलियगस यांनी नवीन भविष्य वर्तवले आहे. त्यांच्या मते येत्या १३ मेपासून १३ ऑक्टोबरपर्यंतच्या काळात तिसरे महायुद्ध होणार आहे. या महायुद्धाला ट्रम्पच कारणीभूत असणार आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

विलियगस यांनी म्हटले आहे की, जगातील शक्तीशाली नेता सिरियावर आक्रमण करील. कदाचित् रासायनिक आक्रमणही केले जाऊ शकते. यामुळे रशिया, उत्तर कोरिया आणि चीन यांच्याशी या नेत्याला युद्ध करावे लागेल.

विलियगस यांनी म्हटले आहे की, सिरियाचे राष्ट्रपती असद यांचा बॉम्बस्फोटात मृत्यू होईल. १३ एप्रिल ते १३ मेच्या कालावधीत युद्धाच्या संदर्भात विविध घटना घडतील. यात खोट्या माहितीच्या आधारे आक्रमण केल्याच्याही घटना घडतील. यात उत्तर कोरिया आणि सिरिया यांच्याविषयी घटना असतील.

विलियगस यांनी नोस्टॅ्रडॅमसच्या भविष्यवाणीचेही समर्थन केले. नोस्टॅ्रडॅमसने म्हटले आहे की, या युद्धात एकाच वेळी शेकडो शक्तींमध्ये संघर्ष होणार असून यात मोठ्या प्रमाणात मृत्यू होणार आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *