Menu Close

ओएल्एक्स् इंडिया या संकेतस्थळाकडून विज्ञापनाद्वारे हिंदु साधूंचे विडंबन !

अशा प्रकारे अन्य धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावण्याचे धाडस ओएल्एक्स् इंडिया या संकेतस्थळाने केले असते का ? हिंदूंनो, तुमच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या संकेतस्थळावर बहिष्कार घाला !

मुंबई : ओएल्एक्स् इंडिया हे वापरलेले भ्रमणभाष, फर्निचर, भ्रमणसंगणक (लॅपटॉप) इत्यादी गोष्टी विकण्यासाठी विनामूल्य विज्ञापन करणारे संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावर प्रसारित केलेल्या एका विज्ञापनामध्ये हिंदु साधूंचे विडंबन केले आहे. साधूंच्या वेषात विक्री करणार्‍या एका व्यक्तीला बीभत्स हालचाल करतांना आणि अश्‍लाघ्य संवाद करतांना दाखवले आहे. या विज्ञापनामुळे कोट्यवधी हिंदूंच्या धर्मभावना दुखावल्या गेल्या आहेत. (हिंदूंनो, संघटितपणे आणि संयत मार्गाने या संकेतस्थळाला विरोध करा, तसेच अन्य धर्मियांप्रमाणे तुमच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची काळजी घ्या ! – संपादक)   

सतर्क धर्माभिमानी हिंदूंनी हिंदु जनजागृती समितीला त्वरित या घटनेची माहिती दिली. त्यानुसार हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी ओएल्एक्स् इंडिया या संकेतस्थळाला संपर्क करून आणि संगणकीय पत्र पाठवून हे विज्ञापन प्रसारित केल्याविषयी निषेध नोंदवला, तसेच हे अवमानकारक विज्ञापन सर्व प्रसिद्धीमाध्यमांवरून, तसेच यू ट्यूब या संकेतस्थळावरून काढण्याची मागणी केली आहे. ओएल्एक्स्ने ४८ घंट्यांत या संदर्भात खुलासा करू, असे सांगितले आहे; परंतु अजून समितीला कोणतेही उत्तर मिळालेले नाही.

धर्माभिमानी हिंदू पुढील संपर्क

पत्त्यावर त्यांचा निषेध व्यक्त करत आहेत –

ओएलएक्स (OLX) संकेतस्थळाचा संगणकीय पत्ता (इमेल) :
१. [email protected]
२. [email protected]

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *