हिंदूबहुल भारतात हिंदूंना अशी मागणी करावी लागते, हे लज्जास्पद ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
नोएडा (उत्तरप्रदेश) : कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असणार्या श्रीरामाची अयोध्येत जन्मभूमी आहे. हा निर्णय वर्ष २०१० मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. तरीही आतापर्यंत हिंदूंना या पवित्र भूमीवर पूजा करण्याची अनुमती का नाही ? हिंदूबहुल भारतात श्रीरामजन्मभूमीत हिंदूंना पूजा करू न देणे याहून हिंदूंसाठी मोठे दुर्दैव कोणते असेल ? आता केंद्र आणि उत्तरप्रदेश दोन्ही ठिकाणी भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार आहे त्यामुळे त्यांनी पूजा करण्याची अनुमती द्यावी. तसेच राममंदिराच्या निर्मितीसाठी संसदेत कायदा बनवावा, अशा मागण्यांचे निवेदन हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी नोएडाचे शहर दंडाधिकारी रामानुज सिंह यांना दिले.
या व्यतिरिक्त देशात अवैधरित्या रहाणारे रोहिंग्या मुसलमान यांना देशातून बाहेर हाकलावे, पाकने कुलभूषण जाधव यांची सुटका न केल्यास पाकला जशास तसे उत्तर द्यावे, अंदमान-निकोबार सहित देशातील शहर, इमारती, मार्ग, स्थानक यांना देण्यात आलेली आक्रमणकर्त्यांची नावे पालटावीत; बोधन (तेलंगण) येथील इंद्रनारायण मंदिरावर बलजोणीने बनवण्यात आलेली ‘देवल मशिदी’ला पुरातत्व विभागाने हिंदूंचे मंदिर असल्याचे घोषित करावे, अशा मागण्याही या वेळी करण्यात आल्या.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात