आतापर्यंत केवळ हिंदूंच्या मिरवणुकांवर बडगा उगारणार्या पोलिसांचे आता खरे स्वरूप उघड होईल !
पुणे : प्रतिवर्षी गणेशोत्सव मंडळांविरुद्ध ध्वनीप्रदूषण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी राज्यात गुन्हे प्रविष्ट केले जातात; परंतु ईद-ए-मिलादला हजरत महंमद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात येणार्या मिरवणुकांवर काय कारवाई केली, याचा तपशील आतापर्यंत पोलीस किंवा प्रशासन यांच्याकडून उघड होत नव्हता. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात डॉ. महेश बेडेकर यांनी राज्य शासनाविरुद्ध जनहित याचिका प्रविष्ट केली आहे.
याचिकेच्या सुनावणीच्या कालावधीत वर्ष २०१५ चा गणेशोत्सव आणि २४ डिसेंबर २०१५ या दिवशी हजरत महंमद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात येणार्या मिरवणुका यांवर ध्वनीप्रदूषण कायद्यांतर्गत किती नोटिसा बजावण्यात आल्या, तसेच त्या नोटिसा बजावलेल्यांविरुद्ध केलेल्या कारवाईचा अहवाल उच्च न्यायालयाने पोलिसांकडून मागवला आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयानेच पोलिसांना फटकारल्याने शासनाने आता परिपत्रक काढून ही माहिती मागवली आहे.
या परिपत्रकानुसार सर्व पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना त्यांच्याकडील नोटिसा बजावलेल्या सर्व मंडळांवर ध्वनीप्रदूषण (नियमन आणि नियंत्रण) नियम २००० आणि पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ प्रमाणे कारवाई करावी, तसेच त्याचा अहवाल कळवण्यात यावा, असे आदेश देण्यात आले आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात