Menu Close

कुलभूषण जाधव यांची फाशी रहित करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीकडून आग्रा येथे स्वाक्षरी अभियान

स्वाक्षरी अभियान राबवतांना हिंदुत्वनिष्ठ आणि नागरिक

आग्रा (उत्तरप्रदेश) : येथे पाककडून अटकेत असणारे भारतीय नागरिक श्री. कुलभूषण जाधव यांची फाशीची शिक्षा रहित होण्यासाठी हिंदु जनजागृती समितीकडून स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले. या वेळी समितीचे आणि हिंदू सेनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

कुलभूषण जाधव यांनी फाशी देण्याऐवजी मुंबईवरील आक्रमणाचा सूत्रधार आणि ‘लष्कर-ए-तोयबा’चा प्रमुख हाफिज सईद याला पकडून फाशी देण्याचे धाडस पाकने दाखवावे. भारत सरकारना पाकवर दबाव निर्माण करून कुलभूषण जाधव यांची फाशीची शिक्षा रहित करून त्यांना मुक्त करावे, अथवा पाकला जशास तसे उत्तर द्यावे. यासाठी आतापर्यंत भारतात अटकेत असणार्‍या पाकच्या गुप्तहेरांना फासावर लटकवावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *