-
इंदूर (मध्यप्रदेश) येथे ‘हिंदु राष्ट्र आणि अडचणी’ या विषयावर राष्ट्रीय परिसंवाद
-
सनातनच्या अॅण्ड्रॉइड आणि आयओएस् (ios (iphone)) ‘अॅप’चे प्रकाशन
सनातन संस्थेच्या Sanatan.org या संकेतस्थळाला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहून संकेतस्थळाचे अॅण्ड्रॉइड आणि आयओएस् (ios (iphone)) अॅप यांचे येथे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. हे अॅप इंग्रजी, हिंदी आणि मराठी या ३ भाषांमध्ये आहे. वाचक हे अॅप विनामूल्य ‘डाऊनलोड’ करून सनातन संस्थेच्या संकेतस्थळावरील माहिती पाहू शकतात. यामध्ये, विविध सणांची माहिती, आचारधर्म आणि साधनेविषयक माहिती, तसेच नवीन लेख वाचता येऊ शकतात. या समवेतच आध्यात्मिक त्रासांवर विविध उपचार आणि आपत्काळासाठी उपायपद्धती हे प्रमुख सदरही पाहिले जाऊ शकते.
डाऊनलोड लिंक :
१. Android : https://play.google.com/store/apps/details?id=ss.android.app
२. IOS : https://itunes.apple.com/us/app/sanatan-sanstha/id1220748650?mt=8
इंदूर (मध्यप्रदेश) : जर एक संन्यासी राज्याचा मुख्यमंत्री बनू शकतो, तर देशाला हिंदु राष्ट्र करण्यात काय अडचण आहे ? आतापर्यंत केवळ जम्मू-काश्मीरमध्येच फुटीरतावादी चळवळी डोके वर काढत होत्या; परंतु आता देहली, ओडिशा, भाग्यनगर (हैद्राबाद), मुंबई, केरळ येथेही भारताचे तुकडे होण्याच्या घोषणा देण्यात येत आहेत. त्यामुळे भारत सरकारच्या संकेतस्थळावरही आता ‘द लॅण्ड ऑफ हिंदू’ असणे आवश्यक आहे. जगात १५७ देश ख्रिस्ती आणि ५२ देश मुस्लिम आहेत, तर १०० कोटी लोकसंख्या असणारा भारत हिंदु राष्ट्र का होऊ शकत नाही ? याकरता हिंदूंचे संघटन आवश्यक आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी केले.
स्टेट प्रेस क्लबच्या वतीने येथील दुआ सभागृहामध्ये ‘हिंदु राष्ट्र आणि अडचणी’ या विषयावर राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादात प्रमुख वक्ते म्हणून श्री. वर्तक बोलत होते. या कार्यक्रमाला प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष कृष्णकुमार अष्ठाना उपस्थित होते.
श्री. वर्तक म्हणाले, ‘‘वर्ष २०२३ मध्ये भारत नक्कीच हिंदु राष्ट्र बनेल. त्यासाठी राज्यघटनेत सुधारणा करणे आवश्यक आहे. देशाच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात घटनेत ४२ वी सुधारणा करून भारताला ‘धर्मनिरपेक्ष’ राष्ट्र घोषित करण्यात आले. धर्मनिरपेक्षतेचा अर्थ सर्वधर्म समभाव आहे; मात्र याचे पालन कुठेही होतांना दिसून येत नाही. येथे हिंदु-मुसलमान यांच्यात भेद करण्यात येतो. एकाच शाळेत शिकणार्या गरिब मुलांना शिष्यवृत्ती मिळते, मुसलमान मुलांना सच्चर समितीप्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येते. येथे धर्मनिरपेक्षता कुठे शिल्लक आहे ? कारण घटनेत धर्मनिरपेक्षतेची व्याख्याच देण्यात आलेली नाही. त्यामुळे भारताला हिंदु राष्ट्र करण्यासाठी आपल्याला संघटित होऊन लढले पाहिजे. लोकमान्य टिळक काँग्रेसचे १२ वर्षे अध्यक्ष राहिले आहेत. ते म्हणाले होते की, भारताला प्रगती करायची असेल आणि मोठे राष्ट्र बनायचे असेल, तर याला प्रथम हिंदु राष्ट्र घोषित केले पाहिजे. मग हिंदु राष्ट्राविषयी चर्चा होते, तेव्हा काँग्रेस याचा विरोध का करते ?
संपूर्ण जगाला वाचवण्यासाठी आपल्याला धर्माचरण केले पाहिजे ! – रमेश शर्मा, वरिष्ठ पत्रकार आणि उपाध्यक्ष, राष्ट्रीय एकता समिती
ऋग्वेदाच्या प्रथम खंडातच ‘हिंदु’ शब्दाचा उल्लेख आहे. हिंदु आणि संस्कृत हे शब्द संपूर्ण जगात पसरले आहेत. भाषा, संस्कृती, धरती या तिन्ही मातृस्थानी आहेत. यांचे रक्षण झाले, तर राष्ट्रनिर्माण होईल. ‘एक व्यक्तीही राष्ट्रनिर्माणची गोष्ट करत असेल किंवा माणसाला माणूस बनवण्याचा प्रयत्न करत असेल, तर समजावे की, तो हिंदु आहे.’ पूर्वी संपूर्ण जग भारताकडून प्रमाणपत्र घेत असे आणि आता आम्ही इतरांकडे प्रमाणपत्र मागतो. संपूर्ण जगाला वाचवायचे आहे, तर आम्हाला हिंदु झाले पाहिजे, आम्हाला आमच्या धर्माचे आचरण केले पाहिजे. जगात असा कोणताही देश नाही, जेथे राम आणि संस्कृत हे शब्द नाहीत.
हिंदु राष्ट्रासाठी आईच्या गर्भातून ‘मी हिंदु आहे’, असे म्हणण्याची आवश्यकता ! – राहुल कोठारी, राष्ट्रीय उपाध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा
काँग्रेस आणि डावे यांनी फार पूर्वीपासून प्रसारमाध्यमांना त्यांच्या कह्यात ठेवून सातत्याने गरळओक करत आले आणि ‘हिंदुत्व हा एक धोकादायक विचार आहे’, असे सांगत आले. सुदैवाने आज ह्या गोष्टींना जनतेने नाकारले असून अखंड भारतासाठी पाऊल उचललेले आहे, ज्याचा परिणाम लोकसभा आणि उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणुकांमध्ये पहायला मिळाला आहे. अशा प्रकारच्या राष्ट्रविरोधी तत्त्वाचा अपप्रचार हाच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील मुख्य अडचण आहे. भारताची जनताच याला एकता आणि अखंडता यांच्या माध्यमातून या अपप्रचाराला उत्तर देणार आहे. आम्ही जेव्हा ‘लोककल्याणातून रामराज्य स्थापन करण्याची गोष्ट करतो, तेव्हा आम्हाला विरोध चालू होतो. आम्ही म्हणतो की, ‘वन्दे मातरम्’ म्हटले पाहिजे, तर विरोध चालू होतो. आम्ही म्हणतो की, विदेशातून येणारे आर्थिक साहाय्य बंद व्हायला पाहिजे, तर आम्हाला विरोध होतो. जेवढे दाऊद इब्राहिम आणि अबू सालेम देशद्रोही आहेत, तेवढेच राष्ट्रविचारांना सातत्याने विरोध करणारे मार्कण्डेय काटजू आणि सच्चर हेही देशद्रोही आहेत. जर आम्हाला काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण भारताला हिंदु राष्ट्र करायचे आहे, तर आम्हाला मोठा संघर्ष करावा लागेल. आम्ही म्हणतो की, ‘गर्व से कहो हम हिन्दू है’; परंतु आज लहान मुलानेही त्याच्या आईच्या गर्भातून अभिमानाने ‘मी हिंदु आहे’, असे म्हणण्याची आवश्यकता आहे.
हिंदु राष्ट्रासाठी संस्कार, संस्कृती आणि संस्कृत यांना बलशाली केले पाहिजे ! – माला सिंह ठाकूर, क्षेत्रीय संयोजिका, दुर्गावाहिनी
आम्ही या देशाला माता मानतो, पर्वत, झाडे आणि नद्या यांच्यात देवत्व पहातो, हीच भारताची संस्कृती आहे. देवी अहल्या होळकर यांनी त्यांच्या राज्याबाहेरही संपूर्ण भारतात मंदिरे, धर्मशाळा, मठ आणि नद्यांचे घाट बांधले होते, हीच आमची राष्ट्रीय संस्कृती आहे. हिंदु राष्ट्राला परमोच्च स्थानी पोचवण्यासाठी आम्हाला जागले पाहिजे आणि आमचे संस्कार, संस्कृती आणि संस्कृत यांना बलशाली केले पाहिजे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात