एरंडोल (जिल्हा जळगाव) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन
जळगाव : शासनाने विशेष अधिकाराचा वापर करून श्रीराम मंदिर उभारावे. काँग्रेस आणि डाव्या-उजव्या विचारसरणीच्या राजकारण्यांनी अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरणासाठी हा विषय प्रलंबित ठेवला आहे. या देशावर प्रथम अधिकार हिंदूंचा आहे. हिंदु जनजागृती समितीचा उपक्रम स्तुत्य आहे, असे प्रतिपादन भाजपचे माजी नगरसेवक श्री. जगदीश ठाकूर यांनी केले. एरंडोल येथील बसस्थानक परिसरात करण्यात आलेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या वतीने ते बोलत होतेे. एरंडोल शहरात प्रथमच आंदोलनाचा उपक्रम घेण्यात आला. या वेळी हिंदूंची उपस्थिती लक्षणीय होती.
समान नागरी कायदा तातडीने व्हावा, श्रीराममंदिरात कायमस्वरूपी पूजा करण्याची अनुमती मिळावी आणि देशातील शहरे, गाव आणि वास्तू यांची परकीय नावे पालटावीत, या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.
राजकारण करणारे वातानुकूलित यंत्राच्या थंड हवेत झोपतात आणि प्रभु श्रीरामचंद्रांची मूर्ती झोपडीत तळपते ! – संदीप फुलपगार
शिव-जय प्रतिष्ठानचे संदीप फुलपगार म्हणाले, ‘‘प्रभु श्रीरामचंद्रांच्या नावे राजकारण करणारे वातानुकूलित यंत्राच्या थंड हवेत झोपतात आणि प्रभु श्रीरामचंद्रांची मूर्ती मात्र झोपडीत तळपत आहे. यासाठी हिंदु राष्ट्र स्थापन करणे काळाची आवश्यकता आहे.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात