भुवनेश्वर : हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येऊन चालू केलेल्या इंडिया अगेन्स्ट इस्लामिक स्टेट मोहिमेचा शुभारंभ ओडिशा राज्यात पार पडल्याची घोषणा संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी २७ जानेवारीला येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. या वेळी भारत रक्षा मंचचे राष्ट्रीय समन्वयक श्री. मुरली मनोहर शर्मा, राष्ट्रीय सचिव श्री. अनिल धीर आणि राज्य उपप्रमुख श्री. जितेंद्र गुप्ता उपस्थित होते.
या प्रसंगी बोलतांना श्री. शिंदे म्हणाले कि,
१. जिहादी संघटना इस्लामिक स्टेटने संपूर्ण जगात इस्लामिक राज्य स्थापन करण्यासाठी युद्ध छेडले आहे. या संघटनेपासून उद्भवणारा धोका हा पाकपुरस्कृत आतंकवाद, बांगलादेशातून होणारी घुसखोरी आणि काश्मीरमधील फुटीरतावाद यांच्यापेक्षा अनेक पटीने अधिक आहे.
२. इस्लामिक स्टेट निष्पाप नागरिकांच्या सामूहिक हत्या, अल्पवयीन मुलींवर बलात्कार, त्यांना बाजारात विकणे ऐतिहासिक वारसा असणार्या वस्तूंचा विध्वंस अशी अमानवी कृत्ये करून भारतात शिरकाव करू पाहत आहे.
३. इस्लामिक स्टेटने भारताला खुरासन राज्य म्हणून त्यावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न चालू केले आहेत.
४. इस्लामिक स्टेटमध्ये भरती होण्यासाठी भारतासहित जगातील इतर देशातील तरुण मोठ्या प्रमाणात उत्सुक आहेत. या संघटनेचे दलाल आणि समर्थक भारतातील प्रत्येक भागात आणि शहरात पसरले आहेत.
५. काश्मीरमध्ये इसिसचे झेंडे फडकवणे, राजस्थानमध्ये इसिसच्या घोषणा देणे, तमिळनाडूत इस्लामिक स्टेटचे टी शर्ट घालणे हे त्यातीलच काही प्रकार आहेत.
६. भारत शासन या संघटनेचा प्रभाव रोखण्यासाठी कार्यरत आहेच. मात्र नागरिकांनीही सामाजिक स्तरावर कार्य आणि जनजागृती करण्यासाठी इंडिया अगेन्स्ट इस्लामिक स्टेट ही संघटना प्रयत्नशील आहे. त्यासाठीच indiaagainstislamicstate.com हे संकेतस्थळ चालू करण्यात आले आहे.
७. या मोहिमेद्वार भारतातील राष्ट्रप्रेमी आणि प्रशिक्षित तरुणांना इस्लामिक स्टेटला धडा शिकवण्यासाठी सिद्ध करणे हे या संघटनेचे उद्दिष्ट आहे.
८. या संघटनेला महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तमिळनाडू आणि आसाममध्ये उत्तम प्रतिसाद मिळत असून ओडिशातील तरुणांना कार्यरत होण्याचे आवाहन करत आहोत.
९. राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेने केलेल्या पाहणीनुसार इस्लामिक स्टेट, इंडियन मुजाहादिन, अल् कायदा इत्यादी संघटनांचे सदस्य ओडिशा राज्यात आश्रय घेत आहेत. यासाठीच ओडिशा राज्यातील नागरिकांवर महत्वाचे उत्तरदायित्व आहे.
भारत रक्षा मंचचे राष्ट्रीय समन्वयक श्री. मुरली मनोहर शर्मा यांनी सांगितले की, भारत रक्षा मंच राज्यातील काही संवेदनशील गांवांची निवड करून इंडिया अगेन्स्ट इस्लामिक स्टेटच्या माध्यमातून लोकजागृतीची मोहिम हाती घेणार आहे.
भारत रक्षा मंचचे राष्ट्रीय सचिव श्री. अनिल धीर म्हणाले की, ओडिशा राज्याला ४८० कि.मी. विस्तृत किनारपट्टी आहे. तिच्या सुरक्षेची काहीही व्यवस्था नाही. ३ सहस्र बांगलादेशी घुसखोर ओडिशा राज्यातील किनारपट्टीवर आल्याचे ओडिशाचे मुख्यमंत्री श्री. नविन पटनाईक यांनी विधानसभेत मान्य करतात; तथापि त्यासंदर्भात अद्यापपर्यंत कार्यवाही मात्र करत नाहीत.
या पत्रकार परिषदेला १६ वृत्तपत्रे आणि ९ वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी यांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात