फ्रान्समध्ये राष्ट्राध्यक्ष पदासाठीची निवडणूक
- भारतात जिहादी आतंकवादाच्या विरोधात कोणी असेच आश्वासन दिले, तर त्यालाही येथील राष्ट्रप्रेमी जनतेने तितकेच समर्थन दिल्यास आश्चर्य वाटू नये !
- फ्रान्समध्ये ढोंगी धर्मनिरपेक्षतावाद नसल्याने देशहिताच्या दृष्टीने निवडणुकीत अशा प्रकारचे आश्वासन देता येऊ शकते, हे भारतियांनी लक्षात घ्यायला हवे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
पॅरिस : २३ एप्रिलला फ्रान्समध्ये राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या मतदानाचा पहिला टप्पा पार पडला. या निवडणुकीच्या जनमत चाचण्यांमध्ये देशभरातील मशिदी बंद करण्याचे आश्वासन देणार्या नॅशनल फ्रंट पार्टीच्या नेत्या मरीन ली पेन यांना जनतेने सर्वाधिक पाठिंबा दिल्याचे दिसून आले आहे. पेन यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही पाठिंबा घोषित केला आहे. ट्रम्प यांनी फ्रान्सच्या जनतेला ली पेन यांना निवडून देण्याचे आवाहन केले आहे.
निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मरीन ली पेन यांनी फ्रान्सच्या सर्वच मशिदी बंद करण्यासमवेत ‘देशात तिरस्काराची भावना पसरवणार्या सर्व मुसलमान धर्मगुरूंना देशातून हाकलून दिले जाईल आणि देशाच्या सीमा शरणार्थीसाठी बंद केल्या जातील. देशात कट्टरतावाद पसरवणार्यांवर देशाच्या सुरक्षायंत्रणांचे कडक लक्ष असेल. या प्रकरणी दोषी आढळणार्यांना देशातून हाकलून दिले जाईल. अशा व्यक्तींकडे फ्रान्सचे नागरिकत्व असेल, तर ते सुद्धा काढून घेतले जाईल’, असेही त्यांनी म्हटले होते. ली पेन निवडून आल्यास त्या फ्रान्सच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष ठरतील. २०१२ च्या निवडणुकीत त्या तिसर्या क्रमांकावर होत्या.
फ्रान्समध्ये जिहादी आतंकवाद सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. जानेवारी २०१५ नंतर येथे लहान-मोठी २५ जिहादी आतंकवादी आक्रमणे झाली आहेत आणि यात २३० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. (कुठे केवळ दोन वर्षांत झालेल्या जिहादी आक्रमणानंतर मशिदीच बंद करण्याचे आश्वासन देण्याचा विचार करणारे फ्रान्सचे राजकारणी, तर कुठे गेली तीन दशके देशात जिहादी आतंकवाद चालू असतांना त्याच्या विरोधात तोंड न उघडणारे राष्ट्रघातकी भारतीय राजकारणी ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात