यवतमाळ : येथील विमा चौकात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रध्वजाचा मान राखा चळवळ राबवण्यात आली. या ठिकाणी क्रांतीकारकांची माहिती देणारे प्रदर्शन लावण्यात आले होते. विद्यार्थी, कर्मचारी आणि अन्य नागरिक यांनी या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद दिला. या ठिकाणी रस्त्यात पडलेले राष्ट्रध्वज गोळा करण्यासाठी राष्ट्रध्वज सन्मान पेटी ठेवण्यात आली होती. समितीच्या आवाहनावरून नागरिक रस्त्यात पडलेले ध्वज त्यात टाकत होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात