फोंडा : गोवा राज्यातील जनतेला गुलाम बनवणारा समुद्री लुटारू ‘वास्को-द-गामा’ याच्या नावे गोव्यात ‘वास्को’ हे शहर अद्यापही आहे. गोव्याला स्वातंत्र्य मिळून ५६ वर्षांहून अधिक काळ लोटला, तरी गुलामगिरीच्या खुणा गोव्यात अजून अभिमानाने मिरवल्या जात आहेत, हे दुर्दैव आहे. परकीय आक्रमकांनी दिलेली ही नावे, भारतातील शहरे, वास्तू यांची नावे; तसेच परकीय आक्रमकांच्या नावे दिलेले रस्ते, स्थानके आदींची नावे पालटणे आवश्यक आहे. बोधन (तेलंगना) येथील इंद्रनारायण मंदिरावर अतिक्रमण करून बांधलेली ‘देवल मशीद’ पुरातत्व विभागाने पुन्हा हिंदु मंदिर म्हणून घोषित करणे आणि त्याचे जतन करणे, देशभरातील घुसखोर रोहिंग्या मुसलमानांना देण्यात येणार्या सर्व सुविधा तात्काळ थांबवणे आणि रोहिंग्या मुसलमानांना देशाबाहेर हाकलून लावणे आणि श्रीरामजन्मभूमीवर पूजा करण्यास तत्काळ कायमस्वरूपी विशेष अनुमती देणे या मागण्यांसाठी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या छत्राखाली समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना रविवार, २३ एप्रिल या दिवशी सकाळी जुने बसस्थानक, फोंडा येथे निदर्शने करण्यात आली.
शंखनाद केल्यानंतर आंदोलनाला प्रारंभ झाला. राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या वतीने हिंदु जनजागृती समितीचे राज्य समन्वयक डॉ. मनोज सोलंकी यांनी प्रस्तावना करतांना आंदोलनाचा विषय स्पष्ट केला.
या वेळी करण्यात आलेल्या अन्य मागण्या
१. बोधन या ठिकाणी केंद्रीय पुरातत्व खात्याने निरीक्षण, अभ्यास आणि आवश्यकतेनुसार उत्खनन करून या मंदिराचे सत्य जनतेसमोर आणावे !
२. म्यानमार येथून विस्थापित झालेल्या रोहिंग्या मुसलमानांना भारतात थारा देऊ नये !
३. त्यांना कोणत्याही प्रकारच्या शासकीय सुविधा आणि योजना यांचा लाभ देण्यात येऊ नये !
४. जम्मूतील त्यांच्या स्वतंत्र वसाहतीला देण्यात आलेली मान्यता काढून घेण्यात यावी !
५. भारतीय संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी सर्व परकीय नावे पालटावीत !
शेवटी श्री. गोविंद चोडणकर यांनी ठराव मांडले, तर सूत्रसंचालन श्री. शैलेश बेहरे यांनी केले.
आंदोलनामध्ये सहभागी संघटना – हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, रणरागिणी शाखा, शिवसेना, गोमंतक मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघ
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात