अमेरिकेतील संशोधकांचा निष्कर्ष
क्षणिक सौंदर्य मिळवून देणार्या सैैंदर्यप्रसाधनांपेक्षा हिंदु संस्कृती आचरणात आणून मिळालेल्या दैवी गुणांचे सौंदर्यच मानवाला खरे सुख मिळवून देतेे, हे लक्षात घेतले पाहिजे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
न्यूयॉर्क : सुगंधी साबण, अत्तर, डिओ आणि शाम्पू आदींची आवड असलेल्या व्यक्ती इतरांच्या तुलनेत कर्करोगाला सर्वाधिक बळी पडत असतात, असा निष्कर्ष अमेरिकेत कर्करोगावर संशोधन करणार्या एका संस्थेने काढला आहे. (वारेमाप नफा मिळवण्यासाठी समाजाच्या आरोग्याशी खेळणारी आस्थापने ही समाजद्रोहीच आहेत ! – संपादक)
१. या संस्थेने कर्करोगाच्या रुग्णांच्या आवडीनिवडी, त्यांचे छंद यांचा अभ्यास केला.
२. कर्करोगाचे रुग्ण वापरत असलेले शाम्पू आणि इतर सौंदर्य प्रसाधने यांची चाचणी करण्यात आली. या वेळी साबण, शाम्पू, लिप बाम आणि क्रीम यांमध्ये ‘४ डायऑक्सन’ नावाचे धोकादायक रसायन असल्याचे संशोधकांना आढळून आले आहे. या रसायनाचा मानवी शरीराशी संबंध आल्यास नाक, यकृत आणि स्तन यांचा कर्करोग होतो.
३. काही सनस्क्रीन, लिप बाम यांमध्ये ‘ऑक्सीबेंजॉन’ नावाचे धोकादायक रसायन वापरले जाते. त्याचा परिणाम हार्मोन्सवर होतो, असेही संशोधकांच्या लक्षात आले.
४. रंगीबेरंगी नेलपॉलिश, नेल रिमूव्हर, लिप बाम यात विषारी रसायनांचा वापर केला जातो. यामुळे या सौंदर्यप्रसाधनांचा सर्वाधिक वापर करणार्याला भविष्यात कर्करोगाचा धोका निर्माण होतो.
५. हॅण्ड सॅनिटायझर, डिओ, लहान मुलांचे नॅपकिन, क्रीम, लोशन यामध्येही फेनोग्जीथनोलचा वापर होतो. ज्यामुळे भविष्यात त्या व्यक्तीला त्वचेचे आजार, तसेच कर्करोगही होतो, असे या संशोधनातून पुढे आले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात