Menu Close

‘२०१६ मध्ये मुसलमान करतील युरोपवर हल्ला’, बल्गेरियातील महिलेने केले भाकीत !

मुंबई : बल्गेरियातील एका महिलेने दुसरे महायुद्ध, अमेरिकेतील २००१ चे हल्ले, २००४ ला त्सुनामी येणार, अशी अनेक भाकीते वर्तवली होती. ही भाकीतं काळाच्या ओघात खरी ठरली. वेंजेलिना पांदेवा दिमीत्रोवा असे या महिलेचे नाव होते.

या महिलेने आता २०१६ साठी सुद्धा काय भाकीत वर्तवले आहे, याचा आढावा घेणे गरजेचे आहे. या महिलेच्या अंदाजानुसार २०१६ मध्ये ‘मुसलमान युरोपवर आक्रमण करतील’. (सध्या युरोप मधे उद्भवत असलेले इसिस चे संकट, हे या महिलेची भविष्यवाणी खरी ठरल्याचे द्योतक आहे. – सम्पादक, हिन्दूजागृति)

१९८९ मध्ये २००१ च्या अमेरिकेवरील हल्ल्याचे भाकित करताना म्हटले होते ‘पोलादी पक्षी दोन अमेरिकी भावांना भयानक पद्धतीने पाडतील. यानंतर हल्लेखोर कोल्हे झुडुपात लपतील आणि निरपराधांना रक्त सांडावे लागेल’.

तर २००४ च्या हल्ल्याबद्दल ‘एक मोठी पाण्याची लाट येईल आणि किनाऱ्यावरील गावेच्या गावे नष्ट होतील ज्यात अनेक लोक नाहीशी होतील’, असे भाकित केले होते.

इतकेच नव्हे तर १९३० साली याच महिलेने दुसऱ्या महायुद्धाचेही भाकित वर्तवले होते. राजा दुसरा बॉरीस आणि अॅडॉल्फ हिटलरने तिची भेटही घेतली होती.

वेंजेलिनाने एका वादळादरम्यान वयाच्या सोळाव्या वर्षी आपली नजर गमावली होती.

येत्या काळासाठी तिने काय भविष्य वर्तवले आहे ते आता आपण पाहू.

२०१६ – मुसलमान युरोपावर आक्रमण करतील

२०१८ – चीन जगाची महासत्ता होईल.

२०१३ – पृथ्वीच्या परीभ्रमणाचा मार्ग बदलेल आणि यामुळे पृथ्वीचे ध्रुव वितळायला सुरुवात होईल. पश्चिम आशियात काही ठिकाणी वणवे पेटतील.

२०२५ – युद्धामुळे युरोपची लोकसंख्या नाश पावायला सुरुवात करेल.

२०२८ – मानवजात शुक्रासारख्या ग्रहावर पोहोचण्याचा प्रयत्न करेल.

२०३३ – ध्रुवांच्या वितळण्यामुळे समुद्र पातळी खूप वाढेल.

२०४३ – सिरीयात होणाऱ्या ‘इस्लामिक युद्धामुळे’ मुसलमान ख्रिश्चनांच्या पवित्र रोम वर ताबा मिळवतील.

या महिलेने वर्तवलेल्या शक्यता खऱ्या ठरतात का हे पाहाणे औत्सुक्याचे ठरेल.

स्त्रोत : जी २४ तास

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *