बकरी ईदच्या दिवशी होणार्या प्राण्यांच्या हत्याकांडाला विरोध करण्याचा परिणाम !
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या तथाकथित पुरोगामी महिला यावर तोंड उघडतील का ?
कैरो (इजिप्त) : इजिप्तमधील प्रसिद्ध लेखिका फातिमा नाऊत यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये बकरी ईदला जगभरात होणार्या प्राण्यांच्या हत्याकांडाच्या विरोधात आवाज उठवला होता. मानवी जगातील सर्वांत मोठे हत्याकांड, असा उल्लेख नाऊत यांनी केला होता. मुसलमानांच्या सणांच्या वेळी होणार्या निरपराध प्राण्यांच्या क्रूर हत्यांवर पुन्हा एकदा विचार झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली होती. यात कुठेही इस्लामचा अवमान करण्याचा त्यांचा उद्देश नव्हता; परंतु धर्मांधांनी नाऊत यांच्यावर ईशनिंदेचा आरोप केला. या प्रकरणी नाऊत यांना तीन वर्षे शिक्षा आणि १ लक्ष ७५ सहस्र रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. नाऊत या शिक्षेला कारागृहात राहून आव्हान देऊ शकतात. (वाघांच्या रक्षणासाठी, माणसांना चावणार्या भटक्या कुत्र्यांसाठी पुढाकार घेणारे प्राणीप्रेमी नाऊत यांच्यासाठी काही करतील का ? – संपादक)
इजिप्तमध्ये गेल्या महिन्याभरात ईशनिंदेच्या प्रकरणी शिक्षा होण्याची ही दुसरी घटना आहे. पत्रकार अल बाहरी यांनाही अशा प्रकारे कारागृहात डांबण्यात आले आहे. (भारतातील कथित अहिष्णुतेवर ओरड करणारे, इस्रायलने आक्रमण केल्यावर पॅलेस्टीनी मुसलमान नागरिकांची बाजू घेणारे निधर्मी भारतीय याविषयी का बोलत नाहीत ? – संपादक)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात