Menu Close

सरकारने कुलभूषण जाधव यांना सन्मानाने भारतात आणावे, अन्यथा पाकची मस्ती जिरवण्यासाठी शिवसैनिक सिद्ध आहेत ! – मुरलीधर जाधव, शिवसेना

  • कुलभूषण जाधव यांची फाशी रहित करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ आक्रमक !

  • हुपरी (जिल्हा कोल्हापूर) येथे पाकिस्तानच्या निषेधार्थ तिरडी मोर्चा

कुलभूषण जाधव

हुपरी : भारत सरकारने तातडीची कार्यवाही करत कुलभूषण जाधव यांना सन्मानाने भारतात आणावे, अन्यथा पाकची मस्ती जिरवण्यासाठी शिवसैनिक सिद्ध आहेत, अशी चेतावणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री. मुरलीधर जाधव यांनी दिली. भारताचे निवृत्त नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना खोट्या आरोपाखाली पाकिस्तान सरकारने अटक केल्याच्या निषेधार्थ २२ एप्रिलला शिवसेनेच्या वतीने येथे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेचा तिरडी मोर्चा काढण्यात आला. त्या वेळी श्री. जाधव बोलत होते.

या वेळी पाकिस्तानचा ध्वज आणि शरीफ यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. या वेळी शिवसैनिकांनी पाकिस्तानचा निषेध करून ‘जला दो जला दो पाकिस्तान जला दो’ अशा घोषणा दिल्या. पोलिसांनी आंदोलकांना कह्यात घेऊन नंतर सोडून दिले.

या वेळी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख सर्वश्री सत्ताप्पा भवान, तालुका उपप्रमुख अजित सुतार, विभागप्रमुख राजेंद्र पाटील, शहरप्रमुख अमोल देशपांडे, युवासेना तालुका अधिकारी गणेश कोळी यांसह शिवसैनिक उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *