Menu Close

पाकिस्तानवर आक्रमण हाच कुलभूषण जाधव यांच्या मुक्ततेचा अंतिम मार्ग ! – शिवसेनेचे नगरसेवक सुहास पाटील

  • कुलभूषण जाधव यांची फाशी रहित करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ आक्रमक !

  • मलकापूर येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

आंदोलनात बोलतांना शिवसेनेचे नगरसेवक सुहास पाटील

मलकापूर (जिल्हा कोल्हापूर) : येथील सुभाष चौकात २२ एप्रिलला सकाळी ११ वाजता समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या वेळी शिवसेनेचे नगरसेवक श्री. सुहास पाटील यांनी पाकिस्तानवर लष्करी कारवाई करणे आणि पाकिस्तानवर आक्रमण हाच कुलभूषण जाधव यांच्या मुक्ततेचा अंतिम मार्ग आहे, असे सांगितले.

या वेळी हिंदुत्वनिष्ठ मानसिंग देसाई, आेंकार बेंडके, अभिमन्यू पाटील, हरिहर स्वामी, बळी पाटील, बाबुराव पाटील, चारूदत्त पोतदार, हिंदु जनजागृती समितीचे प्रसाद कुलकर्णी, मिलिंद बेंडके आदी हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.

मान्यवरांचे मनोगत

माजी शिवसेना जिल्हा उपप्रमुख श्री. जयवंतराव काटकर म्हणाले की, पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबावाच्या जोडीला सैनिकी कारवाई हाच पर्याय आहे. राममंदिर हे हिंदूंचे श्रद्धास्थान असून सरकारने त्वरित राममंदिर बांधावे.

हिंदुत्वनिष्ठ श्री. जितेंद्र पंडित म्हणाले की, जनआंदोलनाच्या माध्यमातून सरकारवर दबाव टाकून पाकिस्तानवर कारवाई करण्यास सरकारला भाग पाडावे.

हिंदु जनजागृती समितीचे श्री. मधुकर नाझरे म्हणाले की, रोहिंग्या मुसलमानांना भारतात आश्रय देणे म्हणजे शत्रू पोसणे असे आहे. त्यामुळे त्यांना भारतातून हुसकावून लावले पाहिजे. तसेच त्यांना शासकीय सुविधा देऊ नयेत. राममंदिराची त्वरित उभारणी झाली पाहिजे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *