मुंबई : हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत चुनाभट्टी येथे हिंदूसंघटन बैठकीचे २२ एप्रिलला आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत उपस्थितांना गोवा येथे झालेल्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात हिंदुत्वनिष्ठांनी मांडलेल्या ओजस्वी विचारांची ध्वनीचित्रफीत दाखवण्यात आली.
हिंदु राष्ट्र निर्मितीचे प्रथम चरण असलेल्या ‘अध्यात्म विश्वविद्यालया’ची ओळख करून देणारा माहितीपटही या वेळी दाखवण्यात आला. ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयावर हिंदु जनजागृती समितीचे श्री. दिप्तेश पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या बैठकीत ३० धर्माभिमान्यांनी सहभाग घेतला.
आेंकारेश्वर मंदिरात चालणार्या धर्मशिक्षणवर्गातील सर्वश्री श्रीराम यादव, भरत पटेल, राकेश पाल, मनोज यादव, नितीन दुबे, राजेश पाल, विपुल सिंग आणि राजकुमार शर्मा यांनी बैठक यशस्वी होण्यासाठी पुढाकार घेतला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात