यवतमाळ : हिंदूंना रामजन्मभूमीवर पूजा करण्याची विशेष अनुमती मिळावी आणि श्रीराममंदिरही उभारण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रीय हिंदू आंदोलनात करण्यात आली. येथील दत्त चौकात हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या वेळी श्रीराम जन्मोत्सव समितीचे श्री. मनोज औदार्य, शिवसेनेचे श्री. राजेंद्र गायकवाड, बजरंग दलाच्या सौ. ज्योती अत्रे, सनातन संस्थेच्या साधिका आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांसह ३० धर्माभिमानी उपस्थित होते.
आंदोलनात करण्यात आलेल्या अन्य मागण्या
१. परकियांच्या नावे असलेली शहरांची नावे पुन्हा मूळ नावांनी नामांतरित करावी.
२. घुसखोर रोहिंग्या मुसलमानांना देण्यात येणार्या सुविधा थांबवून त्यांना देशाबाहेर हाकलून द्यावे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात