रायगड : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वशेणी येथील राधाकृष्ण मंदिरामध्ये प्रथमोपचार प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ५० जणांनी याचा लाभ घेतला. या शिबिरासाठी ५० महिला आणि पुरुष उपस्थित होते.
‘प्रथमोपचार प्रशिक्षण काळाची आवश्यकता’ आणि ‘प्रथमोपचारकासाठी आवश्यक गुण’ या विषयावर कु. आरती म्हात्रे यांनी मार्गदर्शन केले, तसेच कु. हेमलता दिवेकर यांनी प्रथमोपचार पेटीविषयी माहिती दिली. ‘मर्माघात होण्याची कारणे आणि त्याची लक्षणे’ याविषयीची तात्त्विक माहिती श्रीमती भालेराव यांनी, तसेच ‘जखम आणि जखमेवर करायचे प्रथमोपचार’ याविषयी आधुनिक वैद्या कु. अदिती भालेराव यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या अंतिम सत्रात प्रथमोपचाराची प्रात्यक्षिके घेण्यात आली.
क्षणचित्रे
१. कु. प्रीती गावंड यांनी गावामध्ये प्रथमोपचार प्रशिक्षणवर्ग घेण्याची सिद्धता दाखवली.
२. श्री राधाकृष्ण मंदिर समिती, खालची आळी ग्रामस्थांच्या वतीने शिबिरासाठी, तसेच समितीचा धर्मशिक्षण वर्ग घेण्यास मंदिर उपलब्ध करून देण्यात आले.
३. शिबिरासाठी दादर बेडी आणि वशेणी येथील धर्मशिक्षणवर्गातील महिलाही सहभागी झाल्या होत्या.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात