धुळे येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन
जळगाव : अयोध्येतील श्रीराममंदिराचा निकाल केंद्र सरकारने तातडीने द्यावा, असे प्रतिपादन हिंदु एकता आंदोलन पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोज घोडके यांनी धुळे येथील महाराणा प्रताप पुतळ्याजवळ झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात केले.
या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. पंकज बागुल यांनी ‘देशभरातील शहरे, वास्तू, रस्ते, स्थानके आदींची परकीय आक्रमकांनी पालटलेली आणि परकियांच्या नावे अद्याप असलेली नावे पुन्हा मूळ हिंदु नावांनी नामांतरित करावीत’, असे सांगितले. देशभरात समान नागरी कायदा तातडीने लागू करण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात आली.
समान नागरी कायदा तातडीने व्हावा, श्रीराममंदिरात कायमस्वरूपी पूजा करण्यास अनुमती मिळावी आणि देशातील शहरे, गावे, वास्तू यांची परकीय नावे पालटावीत, या मागण्याही करण्यात आल्या.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात