Menu Close

दक्षिण आफ्रिकेमध्ये शांतीसाठी हिंदू यज्ञयाग करणार

कुठे जगात शांतीसाठी यज्ञ करणारे हिंदु, तर कुठे इस्लाम म्हणजे शांती असतांना जगभरात आतंकवादी कृती करून अशांती निर्माण करणारे जिहादी ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

पोर्ट शेपस्टन (दक्षिण आफ्रिका) : दक्षिण आफ्रिकेमध्ये शांती प्रस्थापित व्हावी, यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या स्वातंत्र्यदिनी क्वाझुलू-नतालच्या पोर्ट शेपस्टन शहरातील क्रीडा मैदानावर प्राचीन वैदिक यज्ञयाग करण्याचे तेथील हिंदूंनी ठरवले आहे. या यज्ञयागासाठी १०८ हवनकुंड प्रज्वलित करण्यात येणार आहेत. पोर्ट शेपस्टन येथील हिंदु कल्चरल फेडरेशनने इतर हिंदु संघटनांच्या सहकार्याने या महायज्ञाचे आयोजन केले आहे. २७ एप्रिल या दिवशी होणार्‍या या महायज्ञामध्ये वेदशास्त्रसंपन्न पुरोहित सहभागी होणार आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या उगु जिल्ह्याचे महापौर आणि व्यवस्थापक महायज्ञाच्या वेळी उपस्थित रहाणार आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *