धर्मांध आरोपींना मोकळीक न देता पोलिसांनी त्यांना कठोरात कठोर शासन करावे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
कल्याण : ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हेगारी सूचीत अग्रस्थानी असलेल्या २० आरोपींपैकी मम्मू उपाख्य वसीम संजय इराणी (वय २२ वर्षे) आणि अब्दुल्ला संजय उपाख्य सैय्यद इराणी (वय १७ वर्षे) या दोघांना पोलिसांनी अटक केली. यातील एकाने काही दिवसांपूर्वी इराणी वस्तीत पोलिसांवर आक्रमण केले होते.
मध्यंतरी साखळीचोरीच्या संदर्भात राबवलेल्या मोहिमेमुळे त्या घटनांना काही प्रमाणात आळा बसल्याने इराणी चोरांनी दुचाकी आणि महागडे भ्रमणभाष चोरण्यास प्रारंभ केला होता. या गुन्ह्यात दोघांना अटक करण्यात आली.
प्रबोधन करणार्या पोलिसांवरच धर्मांधांकडून आक्रमण केले जाते, याविषयी पोलिसांना काय म्हणायचे आहे ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
पोलिसांनी इराणी वस्तीत प्रबोधन केले होते. याविषयी सनातन प्रभातच्या वार्ताहराने कल्याणचे पोलीस उपायुक्त डॉ. संजय शिंदे यांना विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘अशा प्रबोधन मोहिमांचा लाभ भविष्यात होईल. त्यामुळे गुन्हेगारी आलेख अल्प होईल.’’ (गुन्हेगारांचे केवळ प्रबोधन करून त्यांना सोडून देणारे पोलीसच अशा स्थितीला उत्तरदायी नव्हे का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) प्रबोधन करूनही धर्मांध पोलिसांवर आक्रमण करतात.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात