रत्नागिरी : ‘सध्या देशासमाेर उभ्या असलेल्या दहशतवादाच्या अाव्हानाला सामाेरे जाण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचारच उपयाेगी पडणार अाहेत. मात्र, देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या सावरकरांना देशाने न्याय दिला नाही, अशी खंत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी व्यक्त केली.’ स्वातंत्र्यवीर सावरकरांचे लेखन अाजच्या तरुण पिढीपर्यंत पाेहाेचणे गरजेचे अाहे. अशा संमेलनाच्या माध्यमातून ताे उद्देश साध्य हाेऊ शकताे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयातर्फे अायाेजित २८ व्या स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बाेलत हाेते. या वेळी केंद्रीय मंत्री अनंत गिते, अामदार उदय सामंत, संमेलनाध्यक्ष दादा इदाते, स्वागताध्यक्ष विनायक राऊत अादींची उपस्थिती हाेती. हिंदूत्व हा शब्द अाज संकुचित अर्थाने मानला जाताे. धर्म शब्दाचा अर्थ कर्तव्य असा अाहे. हिंदू धर्माच्या अाधारावर राष्ट्र निर्माण करावे इतक्या उच्च पातळीचे विचार हिंदू धर्मात असल्याचे सावरकरांचे मत हाेते. हिंदुत्व ही जीवनपद्धती अाहे. भारतीय संस्कृती हीच सर्वश्रेष्ठ अाहे,’ असा दावाही गडकरींनी केला.
पुरस्कार वापसीच्या मुद्द्यावर गडकरी म्हणाले, ‘मुंबईत बाॅम्बस्फाेट झाले तेव्हा कुणी पुरस्कार वापस केले नाहीत. अाता पठाणकाेटमधील हल्ल्यानंतरही कुणी तसे केले नाही. कंठशाेष करणाऱ्या या डाव्यांना मुळात संघाचा कार्यकर्ता देशाचा पंतप्रधान हाेताे हेच सहन झालेले नाही,’ अशी टीका त्यांनी केली.
संमेलनाध्यक्ष इदाते म्हणाले, ‘सावरकरांचे विचार अाज जगण्याचे विचार हाेऊ लागण्याचे दिवस अाले अाहेत. सावरकरांनी रत्नागिरीतील १३ वर्षांच्या वास्तव्यात जातिभेदाची नांगी माेडली. तसेच हिंदूंसाठी त्यांनी प्रतिसृष्टी निर्माण केली. त्यांच्या विचारांनी दाेन क्रांत्या घडवून अाणल्या.’
संदर्भ : दिव्य मराठी