Menu Close

कर्नाटक राज्यातील विविध शहरांमध्ये वृद्धिंगत होत असलेले हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रसाराचे कार्य

१. मैसुरू

अ. धर्माभिमान्यांकडून धर्मशिक्षणवर्गांची मागणी : ‘मैसुरू येथे धर्माभिमान्यांसाठी एक बैठक घेण्यात आली होती. त्यासाठी आलेल्या धर्माभिमान्यांनी २ धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याची मागणी केली. अन्य २ धर्माभिमान्यांनी आणखी २ धर्मशिक्षण वर्ग चालू करणार असल्याचे सांगितले.

आ. कुणिगलमधे केलेल्या प्रवचनांचा लाभ अनेक जिज्ञासूंनी घेणे : कुणिगलमधील पवाड बसवण्ण मठ येथे पौर्णिमेच्या निमित्ताने ‘शिवाची उपासना’ या विषयावर सौ. सुमा मंजेश यांनी प्रवचन केले. या प्रवचनाचा लाभ १८० जिज्ञासूंनी घेतला. रुद्रेश चौलट्री येथे ‘धर्माचरण आणि धर्मजागृती’ या विषयावर प्रवचन करण्यात आले. त्याचा लाभ १०० जिज्ञासूंनी घेतला. त्याचप्रमाणे कुणिगल येथे धमाभिमान्यांसाठी एक बैठकही आयोजित करण्यात आली होती.

इ. विद्यार्थ्यांसाठी प्रवचन आणि धर्माभिमान्यांसाठी बैठकीचे आयोजन : गुब्बी, तुमकूरु येथे कु. भव्या गौडा यांनी, तर हासन येथे आंगणवाडी ट्रेनिंग सेंटर येथे सौ. सुजाता जैन यांनी ‘धर्माचरण’ या विषयावर प्रवचन केले. या प्रवचनाचा लाभ अनुक्रमे १५० विद्यार्थी आणि ४० जिज्ञासू यांनी घेतला. त्याचप्रमाणे तुमकूरु येथे धर्माभिमान्यांसाठी घेतलेल्या बैठकीत १२ धर्माभिमानी उपस्थित होते.

२. बेंगळुरु

अ. येथील काडू मल्लेश्‍वर देवस्थानामधे शिवरात्रीनिमित्त ‘शिव उपासना’ या विषयावर प्रवचन करण्यात आले. श्री. मोहन गौडा यांनी केलेल्या या प्रवचनाचा लाभ १०० जिज्ञासूंनी घेतला.

आ. आंध्रपदेश सरकारने अल्पसंख्यांकासाठी १२ टक्के आरक्षण, तसेच कर्नाटक आणि केरळ राज्यांमधे हिंदु नेत्यांवर होणारे आक्रमण यांच्या विरोधात राष्ट्रीय हिंदु आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.

इ. चंदपूर येथे धर्माभिमानी श्री. श्रीनिवास रेड्डी यांनी बैठकीचे आयोजन केले. त्यामध्ये २० धर्माभिमान्यांनी भाग घेतला आणि चंदपूर येथे एक धर्मसभा घेण्याचे ठरवले.’

– श्री. मोहन गौडा, बेंगळुरु

३. शिवमोग्गा

३ अ. हिंदु धर्मजागृती सभेच्या निमित्ताने वैयक्तिक संपर्क करणे आणि ६ संघटनांसाठी प्रवचने होणे : ‘शिवमोग्गा येथे झालेल्या जिल्हा बैठकीस ९ जण उपस्थित होते. हिंदु धर्मजागृती सभेच्या निमित्ताने १६९ जणांशी वैयक्तिक संपर्क करण्यात आला. ६ संघटनांसाठी प्रवचने झाली. या प्रवचनांना सरासरी २० ते २५ हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.

३ आ. धर्माभिमान्यांनी सेवेसाठी प्रतिदिन २ – ३ घंटे वेळ देण्याची सिद्धता दर्शवणे : धर्मजागृती सभेच्या निमित्ताने झालेल्या पूर्वसिद्धता बैठकीत ७० हून अधिक धर्माभिमानी उपस्थित होते. या उपस्थितांपैकी ९ धर्माभिमान्यांनी सेवेसाठी प्रतिदिन २ – ३ घंटे वेळ देण्याची सिद्धता दर्शवली.

३ इ. शिवजयंतीच्या निमित्ताने प्रवचन घेणे : शिवजयंतीच्या निमित्ताने प्रवचन घेण्यात आले. या प्रवचनाचा ७०० लोकांनी लाभ घेतला. प्रवचनानंतर ४ जिज्ञासूंनी समितीच्या कार्यकर्त्यांना आपल्या गावात प्रवचन घेण्यासाठी आमंत्रित केले आहे.

३ ई. राष्ट्रीय हिंदू आंदोलन करणे : फेब्रुवारी मासात (महिन्यात) राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात ३० हून अधिक धर्माभिमानी सहभागी झाले. २० पत्रकार आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांनी या आंदोलनाचे वार्तांकन केले. यांपैकी ४ वर्तमानपत्रांकडून या आंदोलनाच्या वृत्ताला प्रसिद्धी देण्यात आली.

४. शिकारीपूर

४ अ. धर्माभिमान्यांच्या एका बैठकीत व्यष्टी आणि समष्टी साधना यांचे महत्त्व सांगण्याचे नियोजन करणे : येथे धर्माभिमान्यांची एक बैठक घेण्यात आली. या बैठकीला ४ धर्माभिमानी उपस्थित होते. या बैठकीत व्यष्टी आणि समष्टी साधना यांचे महत्त्व सांगण्याचे नियोजन करण्यात आलेे.

४ आ. शिवजयंतीच्या निमित्ताने एका गावात प्रवचन घेण्यात आले. या प्रवचनाचा १५० जिज्ञासूंनी लाभ घेतला.’

– श्री. प्रथमेश, समन्वयक, शिवमोगा केंद्र.

५. मुडबिद्रे

एका ठिकाणी सत्यनारायण पूजेनिमित्त प्रवचनाचे आयोजन करण्यात आले. याचा १०० जिज्ञासूंनी लाभ घेतला. या वेळी सनातन संस्था प्रकाशित ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले.

६. उडुपी

एका महाविद्यालयाच्या प्राचार्यांना संपर्क केला असता त्यांनी ‘महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या ग्रंथांचा एक संच ठेवू’, असे सांगितले. या महाविद्यालयाने सर्व आध्यात्मिक संस्थांनी प्रकाशित केलेल्या ग्रंथांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्याचेही आश्‍वासन दिले आहे.’

७. कार्कळ

अ. एका ठिकाणी भजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. समितीच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी प्रवचन आणि ग्रंथप्रदर्शन यांचेही आयोजन करण्यात आले.

आ. वारंग काजू कारखान्याच्या मालकांनी त्यांच्या कारखान्यातील ४० महिलांसाठी प्रवचनाचे आयोजन केले आहे आणि अन्य एका कारखान्याच्या मालकांनीही धर्मशिक्षणवर्ग चालू करण्यास सांगितले आहे. एका सप्ताहाच्या आत हा वर्ग चालू होईल.

इ. जिज्ञासूंना केलेल्या संपर्कात त्यांनी हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेचे कार्य चालू करण्याविषयी उत्सुकता दाखवली. त्यानुसार मार्च किंवा एप्रिल या मासांत रणरागिणी शाखेचे उद्घाटन करण्याचे नियोजन आहे. यासाठी ३ महिला धर्माभिमान्यांनी पुढाकार घेतला.’

– श्री. विजयकुमार, उडुपी

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *