Menu Close

‘लव्ह जिहाद’ टाळण्यासाठी मुलामुलींना वेगळ्या वर्गात बसवा’ – मेरठ येथील शाळेचा फर्मान

‘लव्ह जिहाद’ टाळण्यासाठी एका शाळेमध्ये मुले आणि मुलींना वेगवेगळ्या वर्गांत बसवण्यात आले आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मेरठमधील रिषभ अॅकॅडमी या शाळेमध्ये असा नियम घालण्यात आला आहे. या शाळेच्या संचालक मंडळावरील सचिवांच्या म्हणण्यानुसार ‘मुस्लिम मुले हिंदू नावे घेतात आणि हिंदू मुलींना ‘नादी लावतात’ आणि हा ‘लव्ह जिहाद’ टाळण्यासाठी शाळेनेच मुलांना आणि मुलींना वेगवेगळ्या वर्गात बसवले आहे.

यासोबतच शाळेतील मुलांना दाढी ठेवायलाही या शाळेने बंदी घातली आहे. त्या शाळेमध्ये गुरूवारी काही मुलांना वर्गात यायला बंदी घालण्यात आली आणि ‘हा मदरसा नाही’ असे सांगत या मुलांना दाढी काढून टाकण्याची तंबी देण्यात आली. तसेच शाळेतील सगळ्या मुलांना ‘योगी कट’ करून यायला सांगितले आहे. योगी कट म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची हेअरस्टाईल होय.

मुलांनी त्यांच्या डब्यात मांसाहारी पदार्थ आणू नयेत, असाही नियम शाळेने काढला आहे. ही शाळा जैन व्यवस्थापनाची असल्यामुळे आम्ही हा नियम लागू केल्याचे शाळेने म्हटले आहे. मुलांच्या डब्यांची तपासणी केली जाईल, असेही शाळेने म्हटले आहे.

स्त्रोत : लोकसत्ता

 

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *