Menu Close

मी आयएसआय एजंट आहे पण मला त्यांच्यासोबत काम करायचे नाही

नवी देहली : पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयचा मी एजंट असून यापुढे मला त्यांच्यासोबत काम करायचे नाही, मला भारतातच राहायचे आहे, असे बेधडक सांगणाऱ्या एका पाकिस्तानी प्रवाशामुळे येथील इंदिरा गांधी विमानतळावर शुक्रवारी खळबळ उडाली.

पाकिस्तानी पासपोर्टवर दुबईहून येथे दाखल झालेल्या मुहम्मद अहमद शेख मुहम्मद रफिक या प्रवाशाने हा दावा केला. नवी देहली विमानतळावर उतरल्यानंतर त्याला काठमांडू येथे जायचे होते. त्या प्रवासाचे त्याने तिकीटही काढले होते. मात्र त्या विमानात न चढता तो सरळ स्वागत कक्षाकडे गेला व तेथील महिला कर्मचाऱ्याला त्याने हे सांगितले. या प्रकारामुळे गडबडून गेलेल्या या महिलेने सुरक्षा अधिकाऱ्यांना पाचारण केले. या अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीतही त्याने हीच री ओढली. आपण आजवर आयएसआयसाठी काम केले. मात्र आता मला भारतात राहायचे आहे, असा दावा या तरुणाने केल्याने तपास अधिकारीही चक्रावले.

संदर्भ : महाराष्ट्र टाइम्स

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *