राष्ट्र आणि धर्म जागृतीच्या विविध उपक्रमांचे आयोजन
हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी वालावल (सिंधुदुर्ग) येथील श्री देव लक्ष्मीनारायणाच्या चरणी धर्माभिमान्यांचे साकडे !
कुडाळ : भारतासह संपूर्ण पृथ्वीवर विश्वकल्याणार्थ हिंदु राष्ट्र स्थापन व्हावे, तसेच हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी देहधारी रहाणे आवश्यक असल्याने त्यांचा महामृत्यूयोग टळावा, त्यांचे प्रकृतीस्वास्थ्य उत्तम रहावे, समस्त भारतीय जनतेमध्ये सनातन हिंदु धर्माच्या नैतिक मूल्यांचे आचरण करण्याची प्रवृत्ती निर्माण व्हावी, तसेच हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यासाठी प्रयत्न करणारे आणि त्याला साहाय्य करणारे सर्व हिंदु धर्माभिमानी यांचे येणार्या आपत्काळात रक्षण व्हावे, त्यांच्या शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक त्रासांचे निवारण होऊन त्यांची आध्यात्मिक उन्नती व्हावी, यासाठी धर्माभिमानी हिंदूंनी स्वयंस्फूर्तीने वालावल (तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग) येथील प्रसिद्ध श्री देव लक्ष्मीनारायण मंदिरात श्रीफळ ठेवले, तसेच श्री देवाच्या चरणी साकडे (गार्हाणे) घातले.
या वेळी धर्माभिमानी सर्वश्री गणपत अनंत घाडी, संतोष चंद्रकांत गवंडे, अशोक मोरेश्वर प्रभु (उपव्यवस्थापक, देवस्थान समिती), अरुण दिनकर सावंत (सेवानिवृत्त शिक्षक), बाबू दत्ताराम ठुंबरे, रामदास मनोहर मेस्त्री, विजय सदाशिव मेस्त्री, सनातनचे ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक गोपाळ लक्ष्मण मुननकर, डॉ. संजय सामंत, गुरुदास प्रभु, दैवेश रेडकर आणि कु. स्मृती गोपाळ मुननकर आदी उपस्थित होते. मंदिराचे पुरोहित श्री. अभय पणशीकर यांनी देवाला गार्हाणे घातले. त्यानंतर सर्वांना प्रसाद देण्यात आला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात