उज्जैन : मध्यप्रदेशात गोहत्याबंदी कायदा असूनही त्याची कार्यवाही होत नाही. त्यामुळे देशात सर्वांत अधिक गोतस्करी मध्यप्रदेशातून होत आहे. देशातील ही गोतस्करी रोखण्यासाठी गायीला राष्ट्रीय पशू घोषित करून गोहत्याबंदी कायदा लागू करावा आणि त्याची कठोरपणे कार्यवाही करावी, अशी मागणी अखिल भारतीय हिंदु महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रत्नदेव महाराज यांनी येथे पत्रकार परिषदेत केली. तसेच त्यांनी मध्यप्रदेशात दारूबंदी लागू करावी, अशीही मागणी केली.
पत्रकार परिषदेत मांडण्यात आलेली विविध सूत्रे . . .
१. मुसलमान त्यांच्या तिहेरी तलाकच्या प्रथेला धार्मिक सूत्र असल्याचे सांगत त्यावरील न्यायालयाचा हस्तक्षेप स्वीकारत नाही, तसेच हिंदूंनीही राममंदिराच्या संदर्भात ते धार्मिक सूत्र असल्याचे सांगत न्यायालयाने हस्तक्षेप करू नये, अशी मागणी करावी.
२. साधूसंतच राममंदिराचा निर्णय घेतील. येत्या रामनवमीपर्यंत १० लाख लोकांना संघटित करून राममंदिराच्या निर्माणाचे कार्य चालू करण्यात येईल. यासाठी हिंदु महासभा लवकरच रथयात्रा काढणार आहे, असे रत्नदेव महाराज यांनी सांगितले.
३. काश्मीरमध्ये देशद्रोही सैनिकांवर दगडफेक करत आहेत, अशा वेळी राष्ट्रप्रेमी तरुण सैन्यदलात भरती होतील का ?, याचा विचार सरकारने केला पाहिजे, असेही ते म्हणाले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात