Menu Close

नंदुरबार येथील हिंदु धर्मजागृती सभेला व्यापारी संघटना उपस्थित राहणार !

व्यापार्‍यांना मार्गदर्शन करतांना श्री. सुनील घनवट

नंदुरबार : शहरातील व्यापारी महामंडळाच्या सभागृहात २६ एप्रिलला झालेल्या व्यापारांच्या बैठकीत हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी प्रथम सभेसाठी सर्व व्यापारी एकत्रित आल्याने त्यांचे अभिनंदन केले. नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होणार्‍या गोवंशियांच्या हत्या, धर्मांतर या समस्यांविषयी जागृती करून त्याविषयी करावयाच्या उपाययोजनाही त्यांनी सांगितल्या. बैठकीला ४५ हून अधिक व्यापारी सहभागी झाले होते.

बैठकीचे आयोजन करणार्‍या व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष श्री. आनंद बाबुराव माळी यांनी सांगितले की, हिंदु धर्मजागृती सभेला व्यापारी संघटना उपस्थित रहाणार आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *