१. काश्मिरी हिंदु विस्थापित दिनानिमित्त फॅक्ट प्रदर्शनाचे आयोजन
१९.१.२०१७ या दिवशी काश्मिरी हिंदू विस्थापित दिनानिमित्त नंदुरबार शहरात मोठा मारुति मंदिर या ठिकाणी काश्मिरी हिंदूंंवर झालेल्या अत्याचारांची माहिती देणारे फॅक्ट प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाला १ सहस्र ५०० हून अधिक जणांनी भेट दिली. या वेळी काश्मिरी हिंदूंंचे सन्मानपूर्वक पुनर्वसन व्हावे, यासाठी राबवण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिमेत ६०० हून अधिक जणांनी स्वाक्षर्या केल्या. समितीच्या या उपक्रमाला स्थानिक आणि राज्यस्तरीय अशा ८ वृत्तपत्रांनी चांगली प्रसिद्धी दिली. या वेळी काश्मिरी हिंंदूंंवरील अत्याचारांची ध्वनी-चित्रचकतीही दाखवण्यात आली.
२. राष्ट्रध्वजाचा मान राखा मोहिमेतील वैशिष्ट्यपूर्ण पैलू
२ अ. निवेदने देणे : पोलीस स्थानकात आणि प्रशासकीय अधिकार्यांना, तसेच १७४ शाळा अन् महाविद्यालये यांत निवेदने देण्यात आली.
२ आ. शिक्षण अधिकार्यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये विषय मांडण्यास अनुमती देणे : नंदुरबार येथील शिक्षण अधिकार्यांना निवेदन दिल्यावर त्यांनी समितीला पत्र देऊन जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये राष्ट्रध्वजाविषयी जागृती करण्यासाठी अनुमती दिली.
२ इ. शाळांतून प्रवचनांचे आयोजन : एकूण ११ शाळांमध्ये ४ सहस्रहून अधिक विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाचा मान राखा या विषयावरील प्रवचनाचा लाभ घेतला.
२ ई. धर्मशिक्षणवर्गातील धर्माभिमान्यांची कौतुकास्पद कृती : धर्मशिक्षणवर्गातील धर्माभिमान्यांनी धरणगाव तालुक्यातील ३ उर्दू शाळांत राष्ट्रध्वजाचा मान राखा याविषयी निवेदन दिले. त्यांनी उस्फूर्तपणे ही कृती केली. मुसलमान शिक्षकांनी या धर्माभिमान्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. ते म्हणाले, तुम्ही करत असलेले कार्य योग्य आहे. त्यांनी आमच्या शाळांमध्ये राष्ट्रध्वजाचा मान राखण्यासंबंधी जागृती करू, असे आश्वासन दिले.
३. सामूहिक वन्दे मातरम् म्हणण्याचे आयोजन
२६.१.२०१७ या दिवशी चोपडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात समितीकडून सामूहिक वन्दे मातरम् म्हणण्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने शहरात प्रसिद्धीही करण्यात आली होती.
४. चोपडा येथील शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात समितीच्या कार्यकर्त्यांना निमंत्रण
चोपडा येथील शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमासाठी समितीच्या कार्यकर्त्यांना निमंत्रण देण्यात आले होते. समितीचे सदस्य या वेळी उपस्थित राहिले.
५. व्हॅलेंटाइन डेच्या विरोधातील राबवलेल्या मोहीमेतील वैशिष्ट्यपूर्ण घटना
५ अ. जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यांच्या विभागीय शिक्षणाधिकार्यांना या मोहिमेविषयी माहिती देऊन निवेदन दिल्यावर त्यांनी व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्याविषयी परिपत्रक काढून ते तीनही जिल्ह्यांतील सर्व महाविद्यालयांना पाठवले.
५ आ. जळगाव येथील धर्माभिमान्यांनी गटागटाने फिरून महाविद्यालय परिसरात आणि शहरात अयोग्य वर्तन करणार्यांना रोखले.
५ इ. राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या वेळी व्हॅलेंटाईनच्या प्रतीकात्मक पुतळ्याला फाशी : नंदुरबार येथे व्हॅलेंटाईनचा प्रतीकात्मक पुतळा बनवून राष्ट्रीय हिंदू आंदोलनात त्याला फाशी देण्यात आली. या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीमुळे आंदोलनाला इलेक्ट्रॉनिक मीडियाचा चांगला प्रतिसाद मिळाला. सुदर्शन न्यूज या राष्ट्रीय वाहिनीवर या आंदोलनाची क्षणचित्रे दाखवण्यात आली.
६. वाघोदा येथे हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन
रावेर तालुक्यातील वाघोदा येथे हिंदु धर्मजागृती सभा घेण्यात आली. या वेळी वाघोदा या गावाजवळील २१ हून अधिक गावांमध्ये बैठका, पत्रके वितरण, उद्घोषणा, तसेच भित्तीपत्रके या माध्यमातून प्रसार करण्यात आला. या वेळी ४० हून अधिक ठिकाणी हिंदुत्वनिष्ठांच्या बैठका घेण्यात आल्या. या बैठकांना अनुमाने १०० हिंदूंची उपस्थिती लाभली. या वेळी उपस्थितांचे व्हॉट्स अॅप क्रमांक घेऊन त्यांना जागो संदेश पाठवणार्यांच्या गटाशी जोडण्यात आले. वाघोदा येथील हिंदु धर्मजागृती सभेला ३ सहस्र ३०० हिंदूंंची उपस्थित लाभली.
– कु. रागेश्री देशपांडे, जळगाव (मार्च २०१७)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात