पाकमध्ये कोणीही धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी नसल्याने हिंदूंच्या बाजूने कोणीही आवाज उठवत नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
खट्टा (पाकिस्तान) : पाकच्या थट्टा जिल्ह्यातील घारो शहरामध्ये अज्ञात धर्मांधांनी २८ एप्रिलला मंदिरातील देवतांच्या मूर्तींची तोडफोड करून त्यांचे अवशेष नाल्यात फेकल्याची घटना घडली. याविषयी ईशनिंदा आणि आतंकवाद अंतर्गत गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.
१. पोलीस अधीक्षक फिदा हुसैन मस्तोई म्हणाले की, या प्रकरणाची चौकशी चालू असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
२. स्थानिक हिंदु नगरसेवक लाल माहेश्वरी यांनी सांगितले की, रात्री मी मंदिरात उपस्थित होतो आणि दुसर्या दिवशीच्या पुजेची सिद्धता करत होतो; मात्र ही घटना रात्री १ ते पहाटे ५ या कालावधीत घडली आहे; कारण सकाळी पूजा करण्यासाठी भाविक आल्यावर मूर्ती जागेवर नसल्याचे आढळले. येथे प्रथम असे घडले.
३. सिंध प्रांताच्या मुख्यमंत्र्यांचे अल्पसंख्यांकांच्या प्रकरणांचे सल्लागार डॉ. खट्टो मल म्हणाले की, आक्रमणकर्त्यांना लवकरच अटक केली जाईल.
४. पाकमध्ये यापूर्वीही हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे येथील मंदिरांना संरक्षण देण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. पाकमध्ये हिंदूंची १ सहस्र ४०० धार्मिक स्थळे आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात