वाटेगाव (जिल्हा सांगली) : छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरा पगड जातींना एकत्र करून शासन केले. त्यांचे शासन आजही आपल्या सर्वांसाठी आदर्श असेच आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात आरक्षण नव्हते, असे मत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री. देवराज पाटील यांनी केले. छत्रपती शिवराय स्मृती समिती वाटेगाव यांच्या वतीने मौजे वाटेगाव बाजारपेठ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती बसवण्यात येणार आहे. त्याच्या भूमीपूजन प्रसंगी बोलत होते.
या वेळी श्रीशिवप्रतिष्ठानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडे (गुरुजी) यांची वंदनीय उपस्थिती होती. या सोहळ्याचे पौरोहित्य श्री. प्रतीक भिडे (गुरुजी) यांनी केले.
या कार्यक्रमासाठी बारा गडांवरून पाणी आणि माती आणण्यात आली होती. ही माती पूजनाच्या प्रसंगी वापरण्यात आली. या वेळी श्रीशिवप्रतिष्ठानचे वाटेगावचे शहराध्यक्ष श्री. राजेश पाटील, सर्वश्री काकासाहेब लोहार, प्रसाद राजमाने, आनंदराव पाटील, यशवंत ग्लुकोजचे अध्यक्ष श्री. रणधीर नाईक, माजी आमदार श्री. मानसिंगराव नाईक, सांगली जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती श्री. रवींद्र बर्डे, खासदार श्री. राजू शेट्टी, वाटेगावचे सरपंच श्री. प्रकाश पाटील, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री भरत जैन, संतोष कुंभार यांसह अन्य मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात