-
कागल, कोल्हापूर आणि संभाजीनगर येथे धर्मजागृती सभेचे आयोजन
-
पेण, रायगड येथे राष्ट्र आणि धर्म या विषयावर व्याख्यान
-
कल्याण, ठाणे येथे मंदिर स्वच्छता अभियान
-
व्याख्यानांच्या आयोजनासाठी हिंदूंचा पुढाकार
पिराचीवाडी येथील धर्मजागृती सभेला हिंदुत्वनिष्ठांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कागल (जिल्हा कोल्हापूर) : तालुक्यातील पिराचीवाडी येथे हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत दत्तमंदिरात धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेला हिंदुत्वनिष्ठांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सभेला शिवसेनेचे युवा नेते सर्वश्री संजय डावरे, उद्योगपती संभाजी मस्कर, माजी सरपंच सौ. छाया मस्कर, रामदास पाटिक गुरुजी या मान्यवरांसह १०५ जिज्ञासूंची उपस्थिती होती.
१. ग्रामदैवत श्री दत्ताला हिंदुत्वनिष्ठ श्री. संजय डावरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून सभेला प्रारंभ करण्यात आला.
२. हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रीतम पवार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
३. समितीचे कार्यकर्ते सर्वश्री सतीश सडोलकर, प्रीतम पवार, अमोल कुलकर्णी, किरण दुसे यांचा सत्कार अनुक्रमे हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री बाळासाहेब डावरे, संभाजी मस्कर, महिपती भोसले, पुंडलिक माने यांच्या हस्ते करण्यात आला.
४. श्री दत्त मंदिरासाठी देवाच्या दर्शनापूर्वी काय करावे आणि दत्ताच्या नामजपाचे महत्त्व या विषयांवरील धर्मशिक्षण फलकांचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
५. श्री. अमोल कुलकर्णी यांनी उपस्थित हिंदुत्वनिष्ठांसमोर समितीच्या कार्याचा आढावा मांडला. श्री. किरण दुसे यांनी उपस्थितांना हिंदु राष्ट्राची आवश्यकता या विषयाअंतर्गत मार्गदर्शन केले.
६. सभेचे सूत्रसंचालन स्थानिक हिंदुत्वनिष्ठ श्री. धनाजी दाभोळ यांनी केले.
क्षणचित्रे
१. सभेनंतर गावातील मान्यवरांनी सभेचा विषय उत्कृष्ट असून आज त्याची आवश्यकता आहे. आपण पुढे असे कार्यक्रम घेण्यासाठी प्रयत्न करू, असे सांगितले.
२. सभेचे आयोजन पिराचीवाडी येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. धनाजी दाभोळ आणि त्यांचे सहकारी श्री. रघुनाथ पाटील यांनी केले होते. (धर्मासाठी कृतीशील होणारे श्री. धनाजी दाभोळ आणि श्री. रघुनाथ पाटील यांचे अभिनंदन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
३. सनातनच्या वतीने लावलेल्या ग्रंथ प्रदर्शनाला जिज्ञासूंचा चांगला प्रतिसाद मिळाला.
४. सभेच्या नंतर प्रश्नोत्तराच्या सत्रात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
गवळीवाडी, सांगली येथे ४ मे या दिवशी हिंदु धर्मजागृती सभा घेण्याचा निर्धार
गवळीवाडी (मिरज) : सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने कृतज्ञता म्हणून गवळीवाडी येथे ४ मे या दिवशी हिंदु धर्मजागृती सभा घेण्याचा निर्धार येथील हिंदु धर्माभिमानी युवकांनी केला. हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्रतिभा तावरे यांनी गवळीवाडी येथील श्रीकृष्ण मंदिरात २३ एप्रिलच्या रात्री ८.३० वाजता अमृत महोत्सवाचे महत्त्व सांगून भारतभर हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. तरी आपण प्रत्येकाने यात वाटा उचलला पाहिजे, असे आवाहन केले. यावर तेथील तरुणांनी उत्स्फूर्तपणे आमच्या गावातही हिंदु धर्मजागृती सभा होईल, असे सांगितले. या वेळी पंधराहून अधिक हिंदु धर्माभिमानी उपस्थित होते.
विशेष : गवळीवाडी गावाचे वैशिष्ट्य म्हणजे तेथील बहुसंख्य लोक वारकरी संप्रदायातील आहेत. त्यांच्यात संघटितपणा असून गावात हिंदु धर्माचे सर्व सण परंपरेप्रमाणे साजरे केले जातात.
पेण, रायगड येथे सनातन संस्थेचे प्रवक्ता अभय वर्तक यांचे मार्गदर्शन
पेण (जिल्हा रायगड) : येथील श्रीलक्ष्मीनारायण वार्षिक प्राणप्रतिष्ठापना महोत्सवानिमित्त सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांचा सत्कार, तसेच त्यांचे राष्ट्र आणि धर्म या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या वेळी व्यासपिठावर पू. रमनचैतन्यजी महाराज, सौ. नयनतारा म्हात्रे, ह.भ.प. धमाल महाराज, ह.भ.प. महेशबुवा काणे उपस्थित होते. श्री. वर्तक यांचा सत्कार ह.भ.प तुकाराम म्हात्रे महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला २०० हून अधिक धर्माभिमानी उपस्थित होते. हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
श्री. अभय वर्तक म्हणाले, आज राष्ट्र आणि धर्म यांच्या समोर अनेक संकटे आहेत. आपण हिंदु राष्ट्रासाठी एक व्हायला हवे. अनेक संकटांतूनही सनातन संस्था कार्य करत आहे. परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे हिंदु राष्ट्र स्थापण्याचे ध्येय पूर्ण करायचे आहे आणि वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्र स्थापन होणारच आहे. हिंदूंच्या देवतांची विटंबना थांबवण्यासाठी हिंदूंनी धर्मशिक्षण घ्यायला हवे. सण धार्मिक पद्धतीने साजरे व्हायला हवेत. हिंदु धर्माचा अभिमान बाळगायला हवा.
संभाजीनगर येथील वाढता आतंकवाद पहाता हिंदूंनी जागृत होणे आवश्यक ! – कु. प्रतीक्षा कोरगावकर, रणरागिणी
संभाजीनगर : जिहादी आतंकवादाची समस्या संभाजीनगरपर्यंत पोचली आहे. आतंकवादी अबू जिंदाल एक रात्र संभाजीनगरमध्ये राहून जातो, देहलीतील बाटला हाऊसच्या आतंकवादी आक्रमणातील सहभागी आतंकवाद्यांकडे संभाजीनगरमधील चितेगावचे सीमकार्ड सापडते, जिल्ह्यात लव्ह जिहादचे प्रमाण वाढत आहे, हे पहाता सर्वांनी जागृत होणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन रणरागिणीच्या कु. प्रतीक्षा कोरगावकर यांनी केले. हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत येथे पहिली सभा २३ एप्रिलला हनुमान मंदिरात घेण्यात आली.
क्षणचित्रे
१. अवघ्या २ दिवसांत सभा ठरवूनही सभेला १०० हून अधिक जण उपस्थित होते.
२. सभेला श्री संप्रदाय, पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू संप्रदायाचे साधकही उपस्थित होते.
३. प्रकाशनगरमधील श्री हनुमान मंदिराचे श्री. देशमुख यांनी मंदिराचे सभागृह, तसेच ह.भ.प. अर्जुन महाराज पांचाळ यांनी ध्वनीक्षेपक यंत्रणा विनामूल्य उपलब्ध करून दिली.
४. सभेनंतरच्या आढावा बैठकित १ शौर्य जागरण शिबीर आणि ३ ठिकाणी सभांची मागणी करण्यात आली. ४ जणांनी सनातन प्रभातचे वर्गणीदार होण्याची सिद्धता दर्शवली.
५. सभेसाठी लागणारे साहित्य ज्ञानदीप शाळेने उपलब्ध करून दिले.
हिंदु राष्ट्र जागृती अभियानानिमित्त कल्याण येथे व्याख्यान आणि मंदिर स्वच्छता अभियान
कल्याण : हिंदूंनी आपापल्या साधनामार्गात राहून समाजहितासाठी एकत्र कार्य करणे ही काळाची आवश्यकता आहे. सध्याच्या भ्रष्ट व्यवस्थेला नेस्तनाबूत करून सुराज्य प्रस्थापित करणे, हे समस्त कर्महिंदूंचे धर्मकर्तव्य आहे. त्यासाठी संघटित होण्याची आवश्यकता आहे. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा वारसा लाभला आहे. आताच्या धर्मग्लानीच्या स्थितीत शौर्याचा जागर व्हायला हवा. तसे झाल्यासच धर्मग्लानी दूर होईल, असे मार्गदशन सौ. दीक्षा पेंडभाजे यांनी येथील सप्तश्रुंगी माता मंदिरात उपस्थित धर्माभिमान्यांना केले. समितीच्या वतीने येथे सकाळी मंदिर स्वच्छता अभियान राबवण्यात आले.
क्षणचित्रे
१. ओम गुरुप्रसाद साधक ट्रस्टचे संचालक श्री. चव्हाण यांनी सर्व प्रकारचे सहकार्य केले. यापुढेही येथे तुम्ही कार्यक्रम घेऊ शकता, असे त्यांनी सांगितले.
२. मंदिराच्या मोकळ्या जागेत दुसरे व्याख्यानही ठरवण्यात आले.
हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि धर्मप्रेमी यांना उपक्रमात सहभागी होण्यासाठी अनमोल पर्वणी !
- हिंदु राष्ट्र जागृती सभांचे आयोजन करणे
- हिंदु शौर्य जागरण शिबिरांचे आयोजन करणे
- गुरुकृपायोगानुसार साधना या विषयावर प्रवचने आयोजित करणे
हे उपक्रम आयोजित करण्यासाठी संपर्क : श्री. सुनील घनवट – ९४०४९५६५३४
शाळा आणि महाविद्यालये यांचे संचालक या उपक्रमात कशा प्रकारे सहभागी होऊ शकतात ?
अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार बनवलेले क्रांतीविरांचे स्मरण, राष्ट्रजागृती आणि धर्मशिक्षण आदी विषयांवरील फलकांचे प्रदर्शन आयोजित करणे
संपर्क : श्री. सुनील घनवट – ९४०४९५६५३४
आ. महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांसमोर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक संशोधनावर आधारित शोधनिबंधांचे प्रस्तूतीकरण करणे
संपर्क : श्री. रूपेश रेडकर – ९५६१५७४९७२
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात