-
हिंदु राष्ट्राच्या अपरिहार्यतेविषयी हिंदूंमध्ये जागृती करण्यासाठी महाराष्ट्रात जागृती अभियान
-
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने सामाजिक उपक्रम
शिवणे : छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या १६ व्या वर्षी मूठभर मावळ्यांसह रायरेश्वराच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक करून हिंदवी स्वराज्य स्थापण्याची शपथ घेतली. हिंदूंना छळणार्या ५ पातशाह्यांना संपवून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच आता आपण सर्वजण हिंदु राष्ट्र स्थापण्यासाठी सिद्ध होऊन त्याचा जागर करूया, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी केले. त्यावेळी हिंदु राष्ट्रासाठी संघटित होण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला. शिवणे ग्रामस्थांनी २७ एप्रिल या दिवशी आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर सर्वश्री ह.भ.प. विलास महाराज दळवी, तुकाराम टिळे, समितीचे अशोक कुलकर्णी उपस्थित होते. या सभेला गावातील धर्माभिमानी सर्वश्री विनायक टिळे, समीर गायकवाड, रामदास म्हस्के, नवनाथ घारे, दिनेश शिंदे, अविनाश देसले, अजिंक्य टिळे आदींसह २०० हिंदुत्वनिष्ठ ग्रामस्थ उपस्थित होते.
श्री. गोखले पुढे म्हणाले,
१. संस्कृत भाषा श्रेष्ठ आणि चैतन्यमय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांना संस्कृत प्रचुर भाषेतून शिक्षण दिले. यातून त्यांनी स्वभाषाभिमान कसा हवा, ते दाखवून दिले. आपणही आपल्या मुलांना स्वभाषेतून शिक्षण देऊन त्यांना समृद्ध करायला हवे.
२. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे लाल महालात शिरकाव करून शाहिस्तेखानाची बोटे छाटली आणि त्याला पलायन करायला लावले, त्याप्रमाणे आज भारतातील बांगलादेशी अन् रोहिंग्या मुसलमान यांना हाकलून लावले पाहिजे.
३. अफझलखानाने स्वराज्यावर चाल करायला जातांना पंढरपूर आणि तुळजापूरचे मंदिर तोडले, त्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी निधर्मींवाद्यांप्रमाणे त्याच्याशी चर्चा करत, तसेच क्रिकेटचा सामना खेळत न बसता प्रखर धर्माभिमान दाखवून दिला.
४. ‘लव्ह जिहाद’चे संकट पुष्कळ वाढत आहे. ‘लव्ह जिहाद’च्या विळख्यात प्रतिवर्षी भारतातील साडेचार लक्षांहून अधिक हिंदु मुलींचे धर्मांतर होते. हे संकट संपवण्यासाठी हिंदु राष्ट्रच निर्माण व्हायला हवे.
क्षणचित्रे
१. सभेपूर्वी शिवणे गावातून ढोल-पथकांच्या गजरात सुशोभित रथातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिकृतीची मिरवणूक काढण्यात आली.
२. शिवणे ग्रामस्थांनी हिंदु राष्ट्राची स्थापना होईपर्यंत संघटित होऊन वैध मार्गाने लढण्याची शपथ घेतली.
३. सभास्थळी सनातनच्या वतीने सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. त्यालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
वैशिष्ट्यपूर्ण
१. सभेतील विचारांनी प्रभावित होऊन तरुणांनी ‘येथील करंज गावातही धर्मजागृती सभा व्हावी’, अशी मागणी केली.
२. धर्माचरणासाठी पुढाकार घेऊन ‘हॅलो’ऐवजी ‘नमस्कार’ म्हणू, अशी प्रतिज्ञा ग्रामस्थांनी एकमुखाने केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात