Menu Close

पुण्यात सामाजिक संकेतस्थळावरून विहंगम मार्गाने प्रसार

पुणे : परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त ‘व्हॉटस् अप’, ट्विटर’ आणि ‘फेसबूक’ या सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून अमृतमहोत्सव अन् हिंदु राष्ट्र यांविषयीचे अनेक संदेशपर मजकूर प्रसारित करण्यात येत आहेत. पुणे जिल्ह्यात ‘व्हॉटस् अप’च्या माध्यमातून आतापर्यंत १३० समुहांमध्ये ११ सहस्र ३०० जणांपर्यंत माहिती पोहोचून प्रसार चालू आहे. ‘फेसबूक’च्या माध्यमातून २६ लक्ष ५० सहस्रांहून अधिक जणांपर्यंत प्रसार झाला. ‘ट्विटर’ या संकेतस्थळावरून #hindurashtra या ‘हॅशटॅग’द्वारे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी म्हणजेच २८ एप्रिलला ‘ट्रेंड’ चालवला होता. हा ‘ट्रेंड’ ३४ लक्ष इतक्या लोकांपर्यंत पोचला.

भारत देशात रामराज्य आणण्यासाठी साधनेची आवश्यकता ! – डॉ. ज्योती काळे

आंबेगाव, पुणे येथे ‘साधना आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या प्रवचनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे : भारतात हिंदु राष्ट्र म्हणजेच रामराज्य व्हावे, असे वाटत असेल, तर प्रत्येकाने साधना करण्याची नितांत आवश्यकता आहे. आज आतंकवाद, नक्षलवाद, इसिस यांना पुरून ‘वसुधैव कुटुंबकम्’ या तत्त्वावर आधारित हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांनी कटीबद्ध होऊया, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या डॉ. ज्योती काळे यांनी केले. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियानां’तर्गत येथील श्री गोरक्षनाथ मठामध्ये २९ एप्रिल या दिवशी ‘साधना आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयावर समितीने आयोजित केलेल्या प्रवचनात त्या बोलत होत्या. या प्रवचनाचा ६० जिज्ञासूंनी लाभ घेतला.

या वेळी डॉ. काळे यांनी सांगितले की, परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘गुरुकृपायोग’ हा जलद आध्यात्मिक उन्नतीसाठी निर्माण केलेला साधनामार्ग आहे. यामुळे इतर कोणत्याही साधना मार्गापेक्षा या मार्गातून जलद आध्यात्मिक प्रगती होते. याची प्रचीती सहस्रो साधकांनी घेतली आहे. या वेळी त्यांनी राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यासाठी काय कृती करायची, तसेच हिंदु राष्ट्राची आवश्यकता आणि हिंदूसंघटन यांविषयीही मार्गदर्शन करण्यात आले.

क्षणचित्रे

१. प्रवचनानंतर अनेकांनी साधनेविषयी शंका विचारून त्यांचे निरसनही करून घेतले.

२. आयोजकांनी मार्गदर्शनासाठी समितीला पुन्हा आमंत्रित केले.

३. सनातनची सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचे प्रदर्शनही कार्यस्थळी लावण्यात आले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *