Menu Close

हिंदु राष्ट्र जागृती अभियान : सांगली येथील हिंदु धर्मजागृती सभेला सहकार्य करण्याचे ग्रामपंचायत सदस्यांचे आश्‍वासन

गवळीवाडी (मिरज) : हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत येथे ४ मे या दिवशी जाहीर हिंदु धर्मजागृती सभा घेण्यात येणार आहे. सभेच्या नियोजनासाठी येथील श्रीकृष्ण मंदिरात २८ एप्रिलला बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीत ग्रामपंचायत सदस्या सौ. आंबूताई गवळी यांनी ‘सभेला पूर्ण सहकार्य करू’, असे सांगितले. या वेळी सर्वश्री लक्ष्मण गवळी, विष्णु गवळी, अरविंद गवळी, राजू गवळी, विक्रम गवळी, युवराज गवळी, अनिल गवळी, संजय गवळी, मुरलीधर गवळी, सुरेश गवळी, खंडेराजुरीचे उपसरपंच श्री. रोकडे, तसेच हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातन संस्थेचे साधक उपस्थित होते. सर्वांनीच सभा यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *