Menu Close

हिंदु राष्ट्र जागृती अभियान : ठाणे जिल्ह्यात विविध उपक्रम राबवून हिंदूंना संघटित करण्याचा हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा निर्धार

  • परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम

  • स्वामी समर्थ महाराजांच्या मठात व्याख्यान

हिंदुत्वाचे विचार घराघरांत पोहोचले पाहिजेत ! – महिलांच्या प्रतिक्रिया

स्वामी समर्थ महाराजंच्या पुण्यतिथी निमित्ताने लोकमान्यनगर भागातील स्वामी समर्थ मठातही ‘हिंदूसंघटन : काळाची आवश्यकता’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. त्याचा लाभ १२५ जणांनी घेतला. उपस्थित महिलांनी ‘हे विचार घराघरांत पोचले पाहिजेत’, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त केली. उपस्थितांनी ठाणे येथील ऐक्य दिंडीत सहभागी होण्याची सिद्धता दर्शवली. ठाण्यातील अंबिका योगकुटीरचे प्रमुख श्री. रामचंद्र सुर्वे यांना सभागृहाच्या संदर्भात संपर्क केला. त्यांनी सनातनच्या ग्रंथांविषयी जाणून घेतले.

ग्रंथप्रदर्शनाला भेट देणार्‍या जिज्ञासूंना माहिती देतांना सौ. सुनीता पाटील

ठाणे : ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियाना’च्या अंतर्गत ठाणे जिल्ह्यात हिंदु ऐक्य दिंडी, ग्रंथप्रदर्शन, प्रवचने, कायदा विषयावर अधिवक्त्यांचे मार्गदर्शन, मंदिर स्वच्छता, बैठका, सभा अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यात सहभागी होण्याची शिवसेनेच्या नगरसेवकाची सिद्धता

सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला नगरसेवकांची भेट

ठाणे : २३ एप्रिलला कामगारनगर येथील ‘दादा एकता ग्रुप रिक्शाचालक संघ’ येथे सनातनच्या वतीने ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले. या वेळी रणरागिणी शाखेच्या सौ. सुनीता पाटील, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते श्री. अतुल देव उपस्थित होते. नगरसेवक आणि शिवसेना विभाग गटसेवक श्री. दिलीप बारटक्के यांनी ग्रंथप्रदर्शनाला भेट देऊन समितीच्या कार्याची प्रशंसा केली आणि समितीच्या कार्यात सहभागी होण्याची सिद्धता दर्शवली. नगरसेविका सौ. चिंदरकर आणि नगरसेवक श्री. एकनाथ भोकर यांसह राजकीय वर्तुळातील प्रत्येक व्यक्तीने प्रदर्शनाचा लाभ घेतला.

हिंदु ऐक्य दिंडीसाठी उपस्थित रहाण्याचा निर्धार

२५ एप्रिलला लोकमान्यनगर येथील ४० वषेर्र् जुन्या महाकाली मंदिराचा ८ वा वर्धापनदिन होता. तेथे ‘हिंदूसंघटन : काळाची आवश्यकता’ या विषयावर सौ. सुनीता पाटील यांनी प्रवचन घेतले. याचा ७० जणांनी लाभ घेतला. या वेळी उपस्थितांनी हिंदु ऐक्य दिंडीसाठी उत्स्फूर्त होकार दिला.

महाकाली देवीनेच हिंदु राष्ट्र स्थापनेचा आशीर्वाद दिल्याचे जाणवणे

सौ. सुनीता पाटील यांनी विषय मांडला. तो मांडण्यापूर्वी मंदिराच्या मुख्य पुजार्‍याने तेथे गर्दी असतांनाही सौ. पाटील यांना बोलावून घेतले आणि त्यांना देवीचे कुंकू, पोफळीचे फूल आणि प्रसाद दिला, तसेच देवीसमोरील दिव्याच्या रांगेतील एक दिवा प्रज्वलित करण्यास सांगितले. याद्वारे प्रत्यक्ष देवीनेच हिंदु राष्ट्र स्थापनेचा आशीर्वाद दिल्याचे जाणवले.

कुठे व्याख्याने झाली ?

  • महाकाली मंदिर, लोकमान्यनगर
  • स्वामी समर्थ मठ, लोकमान्यनगर
  • शिवाजीनगर
  • चेकनाका
  • कल्याण

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी भावपूर्ण प्रार्थना

शिवाजीनगर आणि चेकनाका येथे समितीचे श्री. अतुल देव यांनी प्रवचन घेऊन हिंदु ऐक्याची आवश्यकता विशद केली. या वेळी उपस्थित ५० जणांनी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी भावपूर्णरित्या प्रार्थना केली.

समितीने आयोजित केलेल्या प्रवचनाला १०० समर्थभक्त उपस्थित

उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सौ. दीक्षा पेंडभाजे

कल्याण : स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी कार्यक्रमानिमित्त येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदूसंघटन : काळाची आवश्यकता’ या विषयावर सौ. दीक्षा पेंडभाजे यांनी मार्गदर्शन केले. १०० समर्थभक्तांनी त्याचा लाभ घेतला. या वेळी त्यांनी धर्म आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी सर्वांनी संघटितपणेे कार्य करण्याचे महत्त्व विशद केले.

क्षणचित्र : स्वामी समर्थ संप्रदायाच्या प्रमुखांनी कल्याण येथील हिंदु ऐक्य दिंडीत सहभागी होण्याची सिद्धता दर्शवली.

मातोश्री जमनाबाई कन्या विद्यालयात व्याख्यान

कल्याण : येथे अमृत महोत्सवानिमित्त येथील मातोश्री जमनाबाई कन्या विद्यालय यांना संपर्क करून ‘सध्याची अयोग्य शिक्षण प्रणाली आणि त्यासाठी हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयावर समितीच्या सौ. दीक्षा पेंडभाजे यांनी प्रबोधन केले. याचा लाभ ११ शिक्षिकांनी घेतला.

मंदिर स्वच्छतेच्या अभियानात धर्माभिमानी स्वतःहून सहभागी

अंबरनाथ : २५ एप्रिल या दिवशी येथील पूर्व भागातील सोमेश्‍वर रहिवासी संघाच्या मंदिराची स्वच्छता आणि नंतर ‘हिंदूसंघटन : काळाची आवश्यकता’ या विषयावर प्रवचन घेण्यात आले. मंदिर स्वछतेमध्ये २ धर्माभिमानी स्वतःहून सहभागी झाले. साप्ताहिक सनातन प्रभातच्या वाचक सौ. मीना वास्के दिवसभर सेवेसाठी थांबल्या होत्या. स्वच्छतेसाठी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. गिरीजा भावे आणि सौ. किशोरी कुलकर्णी यांसह ९ जण उपस्थित होते. सौ. किशोरी कुलकर्णी म्हणाल्या, ‘‘सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले हे राष्ट्रगुरु असून हिंदु राष्ट्र येण्यासाठी सतत प्रयत्न करत आहेत. समाजातील अनैतिकता, अधर्माचरण नष्ट करून कल्याणकारी समाजव्यवस्था आणण्यासाठी हिंदु राष्ट्राविना पर्याय नाही. यासाठी हिंदूसंघटन आवश्यक आहे.’’

समाजातील महनीय व्यक्ती किंवा इतर राजकारणी अथवा कलाकार हे त्यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने स्वतःला केंद्रभूत ठेवून कार्यक्रम आयोजित करतात; मात्र राष्ट्र आणि धर्म यांसाठी अहोरात्र झटणारे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे मात्र असे काही न करता हिंदुत्वनिष्ठांना राष्ट्र आणि धर्म यांसाठी कृती करण्यासाठी प्रेरणा देतात. त्यांच्या कृपेमुळेच या उपक्रमांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. यासाठी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करू, तेवढी अल्पच ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि धर्मप्रेमी यांना उपक्रमात सहभागी होण्यासाठी अनमोल पर्वणी !

  • ‘हिंदु राष्ट्र जागृती सभां’चे आयोजन करणे
  • ‘हिंदु शौर्य जागरण शिबिरां’चे आयोजन करणे
  • ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ या विषयावर प्रवचने आयोजित करणे

हे उपक्रम आयोजित करण्यासाठी संपर्क : श्री. सुनील घनवट – ९४०४९५६५३४

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *