वाराणसी : येथील शास्त्रीघाट, वरुणापूल येथे नुकतेच हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी राष्ट्रीय हिंदू आंदोलन केले. यात अधिवक्ता श्री. कमलेशचंद्र त्रिपाठी, श्री. विजय यादव, हिंदू जागरण मंचचे श्री. रवी श्रीवास्तव, श्री. शुभम मिश्रा, आंतरराष्ट्रीय हिंदू सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री. पंकजकुमार सिंह, श्री. अनिल सिंह (सोनु), हिंदू युवा शक्तीचे अध्यक्ष श्री. निर्भय सिंह, श्री. संतोष कुमार दुबे, श्री. प्रदीप चौबे, श्री. कर्ण सिंह, श्री. चित्रांश चौरसिया, सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ता सहभागी झाले होते. आंदोलनानंतर पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्री यांना निवेदन पाठवण्यात आले.
आंदोलनात करण्यात आलेल्या विविध मागण्या
१. श्रीरामजन्मभूमीवर हिंदूंना पूजा करण्याची अनुमती देण्यात यावी.
२. देशात घुसखोरी करून अवैधरित्या रहात असणार्या रोहिंग्या मुसलमानांची त्वरित हकालपट्टी करावी.
३. भारतावर विविध आक्रमणकर्त्यांनी केलेल्या आक्रमणानंतर त्यांची नावे शहर, गाव, इमारती आदींना देण्यात आली आहेत. ती पालटून त्यांची प्राचीन नावे, तसेच भारतीय नावे देण्यात यावीत.
क्षणचित्रे
१. हिंदू जागरण मंचचे श्री. रवी श्रीवास्तव यांनी या वेळी धर्मशिक्षणाचे महत्त्व सांगत धर्मशिक्षण वर्गाची आवश्यकता असल्याचे सांगितले.
२. हिंदू युवा शक्तीचे अध्यक्ष श्री. निर्भय सिंह यांनी पुढील आंदोलनाच्या वेळी प्रत्येकाने स्वतःसोबत ४-५ धर्मप्रेमींना घेऊन यावे, असे आवाहन केले.
३. या आंदोलनाला स्थानिक प्रसारमाध्यमांचा चांगला प्रतिसाद मिळाला. दैनिक जागरण, अमर उजाला, आज, खबर व्हिजन, गांडीव, काशीवार्ता, ज्ञानशिखा टाईम्स, तसेच एस् टिव्ही आणि के टिव्हीचे प्रतिनिधी आंदोलनस्थळी वृत्तसंकलनासाठी उपस्थित होते. दैनिक हिन्दुस्तान टाईम्सच्या वार्ताहराने दूरभाष करून माहिती घेतली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात