खंडाळा (जिल्हा सातारा) येथे श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित धर्मसभा
खंडाळा ग्रामस्थ आणि हिंदुत्वनिष्ठ यांची सहस्रोंनी उपस्थिती
खंडाळा : श्री काशी विश्वानाथ मंदिरासमोर नंदी आहे. त्याच्या डोळ्यांतून येणारे अश्रू सांगतात की, माझ्या देवाचे मंदिर कुणीतरी मुक्त करा. प्रत्येक वेळी न्यायालयात मथुरा आणि श्री काशी विश्वीनाथ मंदिरांच्या संदर्भात हिंदूंचा विजय झाला आहे. आता राममंदिर होणारच. मथुरा आणि श्री काशी विश्वदनाथ मंदिर यांच्या भोवती झालेले आक्रमण हटवून ती मंदिरे मुक्त होतील. गोहत्या बंद होईल. लव्ह जिहाद, धर्मांतर, लँड जिहाद या समस्याही संपतील; कारण अखंड भारतवर्षात हिंदु राष्ट्राची स्थापना होणार आहे, असे प्रतिपादन तेलंगणा येथील भाजपचे आमदार श्री. राजासिंह ठाकूर यांनी केले. येथील एकता मैदानात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आयोजित धर्मसभेत ते बोलत होते. या वेळी श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सांगली विभाग प्रमुख श्री. नितीन चौगुले, ह.भ.प. अशोक महाराज पवार, हिंदू एकता आंदोलन समितीचे सर्वश्री संदीप जायगुडे, बंटी जाधव, अप्पा मालुसरे, तसेच खंडाळा तालुका आणि शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
आमदार श्री. राजासिंह ठाकूर पुढे म्हणाले…
१. तलवारीच्या जोरावर धर्मांतर करणाऱ्यां मोगलांना तलवारीनेच सडेतोड उत्तर देणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. राज्यातील गोरक्षकांवर अनेक गुन्हे प्रविष्ट केले आहेत. गुन्हे प्रविष्ट करणार्यांना मला सांगायचे आहे की, छत्रपती शिवाजी महाराज नसते, तर आज तुम्ही ज्या पदावर आहात, त्या पदावर तुम्ही नसता. उलट तुम्ही मोगलांची गुलामगिरी पत्करत असता.
२. आज कॉन्व्हेंट शाळांमधून आपल्याला राजे, महाराज, क्रांतिकारक यांचे नव्हेे, तर पाश्चििमात्य संस्कृतीचे शिक्षण दिले जाते. नंदुरबारसारख्या ठिकाणी संपूर्ण गावच धर्मांतरित होऊन ख्रिस्ती बनत आहे. या समस्येला कोण रोखणार ?
३. नंदुरबारमध्ये सभा झाल्यानंतर काही तरुणांनी मला सांगितले की, या गावातून अवैधरित्या गोमांस निर्यात केले जाते. महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदी असतांना आजही गोवंशाची कत्तल केली जाते. मला येथील शासनाला सांगायचे आहे की, ही शिवशंभूंची भूमी असून या भूमीवर एकाही गोवंशियांची कत्तल व्हायला नको.
४. छत्रपती संभाजी महाराज यांनी सांगितले होते की, ज्या दिवशी माझा मृत्यू होईल, तेव्हा माझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून एक संभाजी जन्माला येईल. आपल्याला आपल्यातच छत्रपती संभाजी महाराज निर्माण करायचे आहेत. धर्मरक्षणासाठी आपल्यालाच बलवान व्हायचे आहे.
५. १४ मे या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आहे. आपण सर्वांनी वढू (जिल्हा पुणे) येथे जाऊन छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीवर डोके ठेवा आणि स्फूर्ती अन् शक्ती यांची अनुभूती घ्या. मी जेव्हा वढूला जाऊन त्यांच्या समाधीला डोके टेकवले, तेव्हा मला अभिमान वाटला की, धर्माचे रक्षण करणार्यांच्या चरणांवर मला माझे मस्तक टेकवता आले. (किती लोकप्रतिनिधींना असे वाटते ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात )
आमदार श्री. राजासिंह ठाकूर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सभेला आरंभ झाला. श्री. नितीन चौगुले यांनी सभेची रूपरेषा मांडली. त्यानंतर श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांचा मान्यवरांकडून सत्कार करण्यात आला. श्री. सूरज साळुंखे यांनी आभार प्रदर्शन केले.
हिंदु जनजागृती समितीचा आमदार राजासिंह ठाकूर यांच्याकडून नामोल्लेख !
आज अनेक संस्था राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कार्य करत आहेत. पू. संभाजी भिडेगुरुजी यांची श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदु जनजागृती समिती अशा धर्मासाठी कार्य करणा-या कोणत्याही संघटनांमध्ये युवकांनो सहभागी व्हा, त्याविना देशात काय चालले आहे, ते तुम्हाला कळणारच नाही.
श्री. राजासिंह ठाकूर यांनी उपस्थितांना दिली शपथ !
सभेच्या शेवटी आमदार श्री. राजासिंह ठाकूर यांनी सर्व उपस्थितांना छत्रपती संभाजी महाराजांच्या बलीदानाचा सन्मान ठेवायचा असेल, तर शपथ घ्या, असे आवाहन केले. या वेळी त्यांनी उपस्थितांना शपथ दिली, मी ईश्विर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज या सर्वांना स्मरून शपथ घेतो की, आजपासून मी माझे जीवन देशसेवा आणि धर्मसेवा यांसाठी अर्पण करीन. देशात जे हिंदुद्वेष्टे किंवा धर्मांध आहेत; छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या करणा-यांचे वंशज आहेत, त्यांच्याकडून मी एका रुपयाचीही वस्तू विकत घेणार नाही. जे काही विकत घेईन, ते हिंदूंकडूनच घेईन. जय श्रीराम !
आमदार राजासिंह ठाकूर यांचा पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्याप्रती असणारा आदरभाव !
पू. भिडेगुरुजींनी संकल्प केला आहे की, जोपर्यंत शरिरात प्राण आहे, तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी सर्व ठिकाणी जाऊन प्रचार करीन. अशा पू. भिडेगुरुजींना मी नमस्कार करतो !
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात